मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

Updated:June 27, 2025 19:39 IST2025-06-27T14:54:27+5:302025-06-27T19:39:00+5:30

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांत घराच्या आसपास बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेले असते. साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते. त्यामुळे पावसाळ्यात डासांचे प्रमाण जरा जास्त वाढलेले असते.

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

डासांमुळे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया यासारख्या वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे आपल्या कुटूंबाला डासांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आपल्या घरात डास येणार नाहीत, याची पुर्ण काळजी घेतोच.. पण घराबाहेर पडल्यानंतर मुलांना डास चावले तर?

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

त्यासाठीच मुलं घराबाहेर पडण्यापुर्वी या काही गोष्टी करा. त्यामुळे डासांपासून त्यांचं बऱ्याच प्रमाणात संरक्षण होऊ शकेल..

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

घराबाहेर पडण्यापुर्वी मुलांना फूल बाह्यांचा शर्ट, फूल पँट असे अंगभर कपडे घालायला लावा. शिवाय तळपाय झाकले जातील असे बूट किंवा सॅण्डल घालायला सांगा. अंगभर कपडे असल्याने डास चावण्याचे प्रमाण जरा कमी होऊ शकते.

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

मुलांना काळे, निळे, गडद चॉकलेदी असे काळपट शेडचे गडद कपडे घालू नका. या रंगांकडे डास जास्त आकर्षित होतात. त्याऐवजी फिके कपडे घाला. शिवाय फिक्या कपड्यांवर बसलेला डास चटकन दिसतो आणि लगेचच उडवून लावता येतो.

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

मुलांना खूप घट्ट आणि पातळ कपडे घालू नका. कारण अशा कपड्यांमधून डासांचा दंश शरीराला होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो सैलसर कपडे घालायला सांगा.

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

घराबाहेर जाण्यापुर्वी मुलांच्या अंगाला कापुराचं तेल लावा. हे तेल तुम्ही घरच्याघरी तयार करू शकता. त्यासाठी खोबरेल तेलामध्ये कापुर पावडर टाका. या तेलाच्या वासामुळे डास दूर राहतात.

मुलं बाहेर खेळतात तेव्हा त्यांना खूप डास चावतात? ५ टिप्स, डास चावू नयेत म्हणून उपाय

डास चावू नयेत म्हणून वेगवेगळे क्रिमही बाजारात मिळतात. त्यांचा वापर करूनही तुम्ही मुलांना सुरक्षित ठेवू शकता. पण काही जणांच्या त्वचेला ते केमिकलयुक्त क्रिम सहन होत नाही. त्यांच्यासाठी घरच्याघरी तयार केलेलं कापुराचं तेल किंवा लवंगाचं तेलही वापरता येतं.