1 / 7हल्ली हृदयरोगाचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. कमी वयात तरुणांना हार्ट ॲटॅक आल्याची कित्येक उदाहरणे आपल्या बाजुला आहेत. म्हणूनच हृदयाची विशेष काळजी घ्यायला हवी. 2 / 7हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी विशेष महत्त्वाच्या आहेत, याविषयी या काही साध्या सोप्या टिप्स.. 3 / 7सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोज कोणता ना कोणता व्यायाम नक्की करा. कारण व्यायाम केल्याने हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो आणि ऑक्सिजन मिळते. त्यामुळे वॉकिंग, जाॅगिंग, रनिंग, सायकलिंग असा कोणता ना कोणता व्यायाम नियमितपणे कराच..4 / 7वर्षातून २ ते ३ वेळा हृदयासंबंधी माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या करा. कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड लेव्हल तपासून घ्या..5 / 7तुमच्या आहाराविषयी आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसारच आहार नियंत्रित ठेवा. योग्य आहाराद्वारेही हृदयरोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.6 / 7दुधीभोपळ्याचा रस नियमितपणे प्यायल्यानेही हृदयरोग नियंत्रित ठेवता येऊ शकतो, असं रामदेवबाबा सांगतात. 7 / 7त्याचबरोबर कपालभाती, भ्रस्त्रिका, अनुलोमविलोम असे प्राणायाम नियमितपणे करणेही हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात.