डेंग्यूच्या रुग्णांना खाऊ घाला ५ पदार्थ- रोगप्रतिकारक शक्ती वाढून अंगात ताकद येईल- लवकर बरे होतील
Updated:August 20, 2025 17:13 IST2025-08-20T17:03:38+5:302025-08-20T17:13:42+5:30

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढतेच. त्यापैकीच एक मुख्य आजार म्हणजे डेंग्यू.. डेंग्यू झालेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होऊन जाते. प्रचंड अशक्तपणा येतो.
त्यामुळेच अंगात उर्जा येण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्यांना काही पदार्थ नियमितपणे खाऊ घालणे गरजेचे आहे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..(5 superfood for the fast recovery from dengue)
सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे नारळपाणी. त्यामध्ये असणारे इलेक्ट्रोलाईट्स अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात. त्यातून शरीराला आवश्यक असणारे मिनरल्सही भरपूर प्रमाणात मिळतात.(dengue patients must eat 5 foods for getting energy)
काळ्या मनुका, बदाम, अक्रोड असा सुकामेवाही डेंग्यूच्या रुग्णांना नियमितपणे खायला द्या. त्यातूनही भरपूर उर्जा मिळते आणि अंगात ताकद टिकून राहण्यास मदत होते.
पपईच्या पानांचा रसही डेंग्यूच्या रुग्णांना नियमितपणे द्यायला हवा असं डाॅक्टर सांगतात. त्या पानांमध्ये असणारे एन्झाईम रक्तपेशी वाढण्यास मदत करतात.
हिरव्या पालेभाज्या, सलाड प्रकारात मोडणाऱ्या भाज्याही डेंग्यूच्या रुग्णांनी खायला हव्या.
त्याचबरोबर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारी किवीसारची लिंबूवर्गीय फळंही खायला हवीत. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.