मुलांकडून ५ व्यायाम रोज करून घ्या, दृष्टी होईल तेज- कमी वयात चष्मा लागणार नाही
Updated:July 22, 2025 18:52 IST2025-07-22T18:47:03+5:302025-07-22T18:52:45+5:30

हल्लीच्या मुलांचे लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही पाहण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचा परिणाम साहजिकच त्यांच्या डोळ्यांवर होतो आणि त्यामुळेच कमी वयात चष्मा लागण्याचे प्रमाण वाढते.(5 powerful yogasana for improving eyesight in kids)
म्हणूनच मुलांकडून काही व्यायाम नियमितपणे करून घ्या जेणेकरून त्यांची दृष्टी तेज होईल आणि लवकर चष्मा लागण्याचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होईल. (7 simple daily yoga exercises for children for sharper eyesight)
पहिला व्यायाम म्हणजे सकाळी उठल्यानंतर एकदा आणि त्यानंतर दिवसातून ३ ते ४ वेळा दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा आणि हात डोळ्यांवर ठेवून हातांमध्ये निर्माण झालेली उष्णता डोळ्यांना द्या. ज्या मुलांना ऑनलाईन अभ्यास करावा लागतो, त्यांनी तर काही वेळ स्क्रिन पाहिल्यानंतर हा उपाय नियमितपणे अवश्य करावा.
उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने डोळे गोलाकार फिरवा. असे ५ ते १० वेळा करावे. असे दिवसातून दोन वेळा करा.
त्राटक केल्यानेही दृष्टी तेज होण्यास मदत होते. यासाठी मेणबत्ती पेटवून मुलांपासून २ फूट दूर ठेवा. तिच्या ज्योतीकडे मुलांना टक लावून पाहायला सांगा. पापण्यांची उघडझाप करणे टाळावे.
१० ते १५ वेळा पापण्यांची उघडझाप करा. त्यानंतर काही सेकंदासाठी डोळे मिटून घ्या. त्यानंतर पुन्हा पापण्यांची उघडझाप करून डोळे बंद करा. असं साधारण ४ ते ५ वेळा करा. यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत. त्यांच्यातला ओलावा टिकून राहातो.
तुमचे बोट किंवा पेन्सिल डोळ्यांपासून साधारण ६ इंच दूर ठेवा. त्याच्या टोकावर काही सेकंदासाठी लक्ष केंद्रित करा. त्यानंतर दूरवरचे एखादे झाड, घर, डोंगर, आकाश यांच्याकडे काही सेकंद पाहा. पुन्हा पेन्सिलीवर लक्ष केंद्रित करा. असं साधारण ५ ते ६ वेळा करावं.