Join us

शांत-गाढ झोप लागतच नाही- सारखी जाग येते? ५ गोष्टी करा, मस्त झोप होऊन फ्रेश व्हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 16:55 IST

1 / 7
रात्री अंथरुणावर पडल्यावर असं जाणवतं की आपण खूप थकलो आहोत. आपल्या शरीराला आता आरामाची गरज आहे. पण झोप काही लवकर येत नाही. अंथरुणावर तसंच कितीवेळ पडून राहिल्यानंतर मग कधीतरी डोळा लागतो. पण शांत झोप येत नाही.
2 / 7
झोप शांत झाली नाही किंवा अपुरी झोप झाली तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या कामावर होतो. कारण अंगातला आळस, थकवा गेलेला नसतो. म्हणूनच रात्री शांत आणि पुरेशी झोप होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं ते पाहूया..
3 / 7
यापैकी सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती म्हणजे फोन किंवा स्क्रिन दूर ठेवणे. रात्री झोपायला जाण्यापुर्वी किमान अर्धातास तरी मोबाईल अजिबात पाहू नका.
4 / 7
तुमची झोपण्याची जागा स्वच्छ, मोकळी आणि हवेशीर असेल याची काळजी घ्या. खोलीमध्ये पुरेसा अंधार करा आणि मग झोपा.
5 / 7
तुमच्या रात्रीच्या जेवणात कार्ब्सचे प्रमाण वाढवा. एखादी पोळी, भात तुमच्या जेवणात असायला हवा. कार्ब्सयुक्त पदार्थ रात्रीच्या जेवणात असल्यानेही चांगली झोप येण्यास मदत होते.
6 / 7
सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. ही सवय जर लागली आणि रोज सकाळी लवकर उठू लागलात तर आपोआपच रात्री लवकर झोप यायला लागते.
7 / 7
रात्री झोपण्यापुर्वी काही मिनिटांसाठी पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्याने मन शांत होते. त्याचा परिणामही झोपेवर होतोच..
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स