Join us

फॅटी लिव्हरचा त्रास? ५ पदार्थ खा- विषारी पदार्थ बाहेर पडून शरीर हाेईल डिटॉक्स, दुखणं थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2025 18:03 IST

1 / 7
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे फॅटी लिव्हरचा त्रास सध्या अनेकांना होतो आहे. हा त्रास कमी करण्यासाठी काही पदार्थ खाणं नक्कीच उपयुक्त ठरू शकतं, असं काही तज्ज्ञ सांगतात.
2 / 7
फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार औषधं घेणेच उत्तम. पण त्यासोबतच काही पदार्थही तुम्ही रोज खाऊ शकता, जेणेकरून तुमचा हा त्रास कमी होण्यास निश्चितच मदत होईल. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉ. साैरभ सेठी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
3 / 7
पहिला पदार्थ म्हणजे ग्रीन टी. त्याच्यामध्ये असणारे काही घटक लिव्हरवरची सूज कमी होण्यासाठी मदत करतात. शिवाय त्याच्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्सही शरीरासाठी चांगले असतात. पण ३ ते ४ कपपेक्षा जास्त ग्रीन टी दिवसभरात पिऊ नये.
4 / 7
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी बीट खूप उपयुक्त ठरते. सलाड, ज्यूस, कोशिंबीर या माध्यमातून तुम्ही ते खाऊ शकता.
5 / 7
बेरी प्रकारातली फळंही लिव्हरचा त्रास कमी करण्यास मदत करतात. कारण या फळांमध्ये साखर कमी असते आणि फायबर भरपूर असतात. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्यासाठी ते उत्तम ठरतात.
6 / 7
चिया सीड्स आणि सब्जा यांच्यामध्ये ओमेगा ३ आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे लिव्हरसाठी ते उपयुक्त ठरतात.
7 / 7
लीव्हर फायब्रोसिसचा त्रास कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिणेही फायदेशीर ठरते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न