रात्रीच्या जेवणात ५ चुका कराल तर वजन- शुगर दाेन्हीही वाढेल! रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी...
Updated:May 21, 2025 13:30 IST2025-05-21T13:23:37+5:302025-05-21T13:30:35+5:30

वजन आणि रक्तातील साखर या दोन्ही गोष्टी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक दिवसभर व्यवस्थित डाएट करतात. व्यायाम करतात. पण तरीही दिवसाच्या शेवटी म्हणजेच रात्रीचं जेवण करताना त्यांच्याकडून काही चुका होतात.
त्यामुळे मग वजन तर वाढतेच पण त्यासोबतच रक्तातील साखरही वाढते. मधुमेहींसाठी तर ही गोष्ट विशेष धोकादायक ठरणारी आहे. म्हणूनच रात्रीचं जेवण म्हणजेच डिनर करताना काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे.
अनेकजणांचं दुपारचं जेवण ऑफिसमध्ये होतं. त्यामुळे मग रात्रीचं जेवण घरी होत असल्याने ते थोडं हेवी घेतलं जातं. शिवाय कुटूंबातले सगळे रात्री जेवताना एकत्र असल्याने गप्पांच्या ओघात जास्त जेवण जातं. असं होऊ देऊ नका. जेवण जास्त घेत असताना कार्ब्सही जास्त खात नाही ना याकडे लक्ष द्या.
काही जण दुपारी हेवी जेवण करून रात्री जेवण घेणं टाळतात. पण हे आरोग्यासाठी चांगलं नाही. रात्रीचं जेवण गरजेचंच आहे, फक्त ते प्रमाणात होत आहे ना याकडे लक्ष द्यायला हवं.
अनेकांना रात्रीचं जेवण झाल्यानंतर थोडं आईस्क्रिम किंवा एखादा गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुमचं गोड खाणं थोडं जास्त होत नाहीयेना याकडेही लक्ष द्यायला हवं.
रात्रीच्या जेवणातही प्रोटीनयुक्त पदार्थ घेतले पाहिजेत. अन्यथा शुगर क्रेव्हिंग वाढून ओव्हरइटिंग होण्याची शक्यता असते.
रात्रीच्या जेवणात अनेक जण भरपूर भाज्या खाणं टाळतात. पण असं केल्याने शरीरात कमी प्रमाणात फायबर जातात. फायबर कमी प्रमाणात असतील तर पचनक्रिया हळूवार होते आणि त्याउलट रक्तात साखर मिसळण्याचे प्रमाण वाढते.