1 / 7हल्ली कमी वयातच हाडांच्या कित्येक समस्या डोकं वर काढत आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी असे वेगवेगळे त्रास कमी वयातच सुरू झाले आहेत.(5 calcium rich food)2 / 7म्हणूनच आपल्या आहारात असे काही पदार्थ असायला हवेत जे भरपूर प्रमाणात कॅल्शियम देतील, जेणेकरून हाडांना बळकटी मिळेल. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया...(5 foods that gives enough calcium)3 / 7त्यापैकी पहिला पदार्थ आहे तीळ. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी तीळ फायदेशीर ठरतात. भाकरीला लावून, चटणीच्या स्वरुपात किंवा लाडू करून तुम्ही तीळ खाऊ शकता.(calcium rich food for strong bones)4 / 7दुसरा पदार्थ आहे राजगिरा. त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह मिळते. पण आपण राजगिरा फक्त उपवासाच्या दिवशीच खाताे. तसं नस करता तो नियमितपणे खायला हवा. कारण हाडांच्या बळकटीसाठी तो खूप गरजेचा आहे. शिवाय पचायलाही हलका असतो.5 / 7खसखस हाडांच्या मजबुतीसाठी तर फायदेशीर ठरतेच, पण चांगली झोप येण्यासाठी, मज्जासंस्था आणि स्नायूंच्या आराेग्यासाठीही तिचा उपयोग होतो.6 / 7वाढत्या वयाच्या मुलांसाठी आणि महिलांसाठी नाचणी हा कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. नाचणीचे लाडू, इडली, डोसा, पराठे या स्वरुपात नाचणी खायला हवी.7 / 7भरपूर कॅल्शयम देणारा आणखी एक पदार्थ म्हणजे शेवगा. त्यामुळे मोठ्या माणसांनी तर शेवगा खायलाच हवा पण लहान मुलांनाही तो आवर्जून द्यायला हवा.