मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

Updated:June 30, 2025 23:27 IST2025-06-30T23:12:45+5:302025-06-30T23:27:06+5:30

5 best foods to eat during your menstrual cycle : Foods to eat during your period : Foods to Eat on Your Period : Foods that help with period cramps and other symptoms : मासिक पाळीच्या 'त्या' दिवसांत अनेक समस्या त्रास देतात, मग खा हे ५ खास पदार्थ...

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना थकवा, पोटदुखी, चिडचिड होणे, पोट फुगणे, अशक्तपणा अशा शारीरिक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. या दिवसांत शरीराची पोषणाची (5 best foods to eat during your menstrual cycle) गरज वाढलेली असते, त्यामुळे आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास शारीरिक त्रास कमी करता येतो आणि ऊर्जा टिकवून ठेवता येते.

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

मासिक पाळीमध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्ससारख्या (Foods to eat during your period) आवश्यक पोषक घटकांनीयुक्त असणारे पदार्थ खाल्ले, तर हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात आहाराकडे लक्ष देणे हे देखील तितकेच महत्वाचे असते.

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

मासिक पाळीच्या काळात आहारामध्ये नेहमी योग्य पदार्थांची (Foods that help with period cramps and other symptoms) निवड केल्यास आपली तब्येत अधिक चांगली राहू शकते. यासाठीच, मासिक पाळी दरम्यान आपल्या आहारात कोणते पदार्थ असावेत ते पाहूयात.

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे शरीरातील लोह कमी होते. यासाठीच, या दिवसांत पालक, मेथी यांसारख्या लोहयुक्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. हिरव्या पालेभाज्यांमधील मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन 'के' देखील मुबलक प्रमाणात असते, जे सूज आणि पोटदुखी कमी करण्यास मदत करतात. या दिवसांत हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने थकवा दूर होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि मासिक पाळीच्या एकूण आरोग्यासाठी फायदा होतो.

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 मुबलक प्रमाणात असतं, जे मासिक पाळीत होणारे मड स्विंग नियंत्रित करण्यात मदत करतं. याचबरोबर, पोट फुगणे आणि पोटात दुखणे यापासून देखील आराम मिळतो. त्यातील नैसर्गिक साखर त्वरीत ऊर्जा देते, तर त्यातील फायबर पचनक्रिया सुधारते, जी मासिक पाळीच्या काळात मंदावू शकते.

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

७०% किंवा त्याहून अधिक कोको असलेली उच्च दर्जाची डार्क चॉकलेट मॅग्नेशियमनयुक्त असतात. मासिक पाळी दरम्यान डार्क चॉकलेट खाल्ल्याने पोटाचे स्नायू सैल करण्यास आणि मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत होते. त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्सही असतात, जे मूड सुधारतात.

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

दह्यात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. आतड्यांच आणि योनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यास दही खाणे फायदेशीर ठरते. ज्यामुळे मासिक पाळीत वाढू शकणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो. दह्यात असणारे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D मासिक पाळीतील स्नायूंच दुखणं कमी करून, हार्मोनल बदलाच्या काळात मज्जासंस्थेला शांत ठेवायला मदत करतात.

मासिक पाळीचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, वेदना होतात कमी आणि मूडही राहतो चांगला...

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड् भरपूर प्रमाणात असतात, जे हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी आणि मासिक पाळी दरम्यान होणारे इतर त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या बिया पाळीतील पोटाचे फुगणे कमी करून, वेदना शांत करतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारतात. रोज एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास मासिक पाळीच्या काळात शरीराच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यात मदत होते.