Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लिव्हर खराब होत चाललंय हे सांगणारी ४ लक्षणं, सावध व्हा- फॅटी लिव्हर, कोलेस्टेरॉलचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2026 17:04 IST

1 / 6
फॅटी लिव्हरचा त्रास सुरू होण्यापुर्वी शरीरात काही बदल दिसायला लागतात. पण ते माहिती नसल्याने अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मग त्यामुळे लिव्हर दिवसेंदिवस अधिकच खराब होत जातं.(4 warning signs of fatty liver)
2 / 6
फॅटी लिव्हरचा त्रास सुरू झाला की त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होतोच. त्यामुळे मग कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह असे वेगवेगळे त्रासही सुरू होऊ शकतात.(how to identify that liver functioning is getting damaged?)
3 / 6
म्हणूनच आपलं लिव्हर खराब होत चाललंय हे सांगणारी काही लक्षणं वेळीच ओळखायला हवीत. ती लक्षणं नेमकी कोणती याची माहिती डॉक्टरांनी myexpertdocto या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यातलं पहिलं लक्षण म्हणजे खूप थकवा येणं.
4 / 6
जेवण झाल्यानंतर किंवा हलका आहार घेतल्यानंतरही जर काही वेळातच पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर ते एक लिव्हरच्या त्रासाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे अपचनाचा कोणताही त्रास महिनोंमहिने अंगावर काढू नका. डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
5 / 6
वजन आहे तेवढंच आहे पण कंबरेचा घेर मात्र दिवसेंदिवस वाढत जाणे. शरीरात इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार झालं नाही तर त्यामुळे हा त्रास वाढत जातो. लिव्हर जर चांगल्या पद्धतीने कार्यरत असेल तर असा त्रास जाणवत नाही.
6 / 6
ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जर वाढत चाललं असेल तर एकदा लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या तपासण्या नक्कीच करून घ्या.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयरोग