४ फसवे पदार्थ काढतात तुम्हाला वेड्यात, हेल्दी समजून खाता पण असतात खूपच घातक, शुगर-वजन वाढणारच..
Updated:January 23, 2026 18:29 IST2026-01-23T12:14:45+5:302026-01-23T18:29:59+5:30

वाढतं वजन कमी करणं किंवा आहे ते वजन नियंत्रणात ठेवणं हे आता अनेक लोकांसमोरचं मोठं आव्हान झालं आहे.
शिवाय मधुमेह, हृदयविकार, बीपी असे आजारही वाढतच आहेत. हे सगळे आजार नियंत्रित ठेवायचे असतील तर आहारावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण नेमकी तिथेच गल्लत होते आणि आपण असे काही पदार्थ हेल्दी समजून खातो जे खाणं अतिशय धोकादायक असतं.(4 foods which are not actually healthy)
ते पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहा.. त्यापैकी पहिला पदार्थ आहे ब्राऊन ब्रेड. हा ब्रेड गव्हाचा म्हणून काही लोक अगदी पोटभर खातात. पण त्यामध्ये कॅरामलाईज शुगर घातलेली असते किंवा रंग वापरलेला असतो. गव्हाचा म्हणून तो विकला जात असला तरी त्यात खूप कमी प्रमाणात गव्हाचं पीठ असतं. मैदा मात्र भरपूर असतो.(4 unhealthy foods which we considered as healthy)
डायजेस्टीव्ह बिस्किट्स किंवा शुगर फ्री बिस्किट्स, गव्हाच्या पिठाचे बिस्किट असे कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात मिळतात. ते खाणंही टाळायला हवं. कारण या पदार्थांमध्येही साखर, मैदा यांचा भरपूर मारा केलेला असतो.
फ्लेवर्ड योगर्ट खाणंही टाळायला हवं. कारण त्यामध्येही साखर आणि इतर काही प्रिझर्व्हेटीव्ह असतात. खायचंच असेल तर त्याच्याऐवजी घरी तयार केलेलं ताजं दही खायला हवं.
चौथा पदार्थ आहे हेल्दी समजून प्यायले जाणारे कित्येक हेल्थ ड्रिंक्स. या पेयांमध्ये साखर, केमिकल्स, प्रिझर्व्हेटीव्ह भरपूर प्रमाणात असतात. त्यातून कोणतंही पोषण मिळत नाही. उलट वाढली तर शुगर आणि वजन मात्र नक्की वाढते.