फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

Updated:March 1, 2025 20:13 IST2025-03-01T13:51:11+5:302025-03-01T20:13:54+5:30

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

कोणताही पदार्थ जास्त झाला की सरळ उचलायचा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंंतर हळू हळू तो संपवायचा असं जवळपास प्रत्येक घरांतच होतं.(we should not keep these 4 things in fridge)

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

पण काही पदार्थ असे असतात जे २४ तासांपेक्षा जास्त वेळ जर फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(4 food items you must not keep in refrigerator for more than 24 hours)

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

यापैकी पहिला पदार्थ आहे सोललेला लसूण. लसूण फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवल्यास त्याला मोड आल्यासारखे होते. तो लसूण खाण्यात आला तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

दुसरा पदार्थ आहे चिरलेला कांदा. चिरलेला कांदा तर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नये. तो लगेचच वापरून टाका. कारण कांद्यावर खूप लवकर बॅक्टेरिया बसतात. असा कांदा खाल्ल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या इन्फेक्शनमुळे लिव्हर, किडनी खराब होण्याचा धोका असतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते.

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

आलं थोडं थोडं वापरायचं आणि तसंच फ्रिजमध्ये ठेवायचं ही सवय अनेकींना असते. पण असं अर्धवट वापरलेलं आलं फ्रिजमध्ये ठेवू नका. त्यावर जे काही सुक्ष्म कण तयार होतात जे लिव्हरसाठी आणि श्वसननलिकेसाठी घातक ठरू शकतात.

फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

चौथा पदार्थ आहे शिजवलेला भात. भात २४ तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून अजिबात खाऊ नका. त्याच्यावर अनेक सुक्ष्म विषारी घटक तयार झालेले असतात.