Join us

गुलाबाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? ७ ट्रिक्स, थंडीत गुलाबाच्या फुलांनी भरगच्च होईल रोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 23:18 IST

1 / 8
गुलाबाच्या रोपाला दिवसातून कमीत कमी ६ ते ८ तास थेट सुर्यप्रकाश द्या. कमी प्रकाशात फुलं येत नाहीत किंवा लहान येतात. (How To Make Rose Plant Bloom)
2 / 8
मातीचा वरचा थर कोरडा झाल्यावरच पाणी द्या. जास्त पाणी झाल्यास मुळं सडतात तर कमी पाणी झाल्यास कळ्या गळून पडतात.
3 / 8
हिवाळ्याच्या सुरूवातीला किंवा फुलं कमी झाल्यावर हलकी छाटणी करा. यामुळे नवीन फांद्या फुटतात आणि त्यावर फुलं येतात.
4 / 8
फुलून गेलेली किंवा सुकलेली फुलं त्यांच्या देठासह लगेच काढा. यामुळे रोपाची ऊर्जा नवीन कळ्या तयार करण्याकडे जाते.
5 / 8
रोपाच्या वाढीसाठी आणि फुलांच्या काळात फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असलेले संतुलित खत द्या.
6 / 8
वापरलेली चहा पावडर मातीत मिसळा यात नायट्रोजन आणि टॅनिक एसिड असते. ज्यामुळे मातीची आम्लता वाढते आणि फुलं चांगली येतात.
7 / 8
केळीच्या सालीचे तुकडे मातीत मिसळा किंवा त्याची पावडर करून घाला. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे फुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते.
8 / 8
थंडीत रोपाची पाने जास्त वेळ ओली राहिल्यास बुरशीचा धोका वाढतो. त्यामुळे चांगली हवा खेळती राहू द्या.
टॅग्स : बागकाम टिप्ससुंदर गृहनियोजनइनडोअर प्लाण्ट्स