पावसाळ्यात 'या' रोपांची कटिंग करायलाच हवी! काही दिवसांतच भराभर वाढून खूप फुलून येतील
Updated:July 29, 2025 15:34 IST2025-07-29T15:19:41+5:302025-07-29T15:34:14+5:30

पावसाळा हा ऋतू खरंतर असा आहे की या दिवसांत राेपांची खूप भराभर वाढ होते. प्रत्येक पानावर एक वेगळीच चमक आलेली असते. एरवी आपण वर्षभर पाणी घालूनही रोपांना जो टवटवीतपणा देऊ शकत नाही, तो त्यांना एका पावसातच मिळून जातो.
पावसाळ्याच्या दिवसांत रोपांची विशेष काळजी घेण्याची गरज नसली तरी अशा काही गोष्टी करणं गरजेचं असतं जेणेकरून त्यांची येत्या काही दिवसांत भराभर वाढ होईल. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोपांची कटिंग करणं.
काही रोपं अशी असतात ज्यांची पावसाळ्यात कटिंग होणं खूप गरजेचं आहे. ती रोपं नेमकी कोणती याविषयीची माहिती valley_of__flowers या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
त्यापैकी पहिलं रोप म्हणजे गुलाबी जांभळट आणि हिरवा अशा तिन्ही छटा असणारं बोट लिली. या रोपाची कटिंग करून ते इतरत्र लावण्यासाठीही हा ऋतू चांगला आहे.
कन्हेराच्या रोपाची कटिंगही या दिवसांत नक्की करा. जेणेकरून पुढच्या काही महिन्यांत ते छान बहरून येईल आणि त्याला भरपूर फुलंही येतील.
तिसरं म्हणजे बोगनवेल. बोगनवेलीला कापून व्यवस्थित आकार देण्यासाठी पावसाळा हा ऋतू सगळ्यात चांगला आहे.
पावसाळ्यात जेड प्लांटची कटिंग करायलाही विसरू नका. हे रोप चहुबाजुंनी बहरून यायला हवं असेल तर प्रत्येक फांदीचा वरचा एक ते अर्धा इंच एवढा भाग कट करा.
वंडरिंग ज्यू आणि पर्पल हार्ट या रोपांची कटिंग करून ती तुम्ही या दिवसांत अनेक छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून ठेवू शकता. ही रोपं खूप वेगाने वाढतील. त्यातून आकर्षक सजावटही करता येते.