Join us

जास्त पावसामुळे मनीप्लांटची पानं पिवळी पडून गळू लागली? ४ टिप्स, मनी प्लांट होईल हिरवागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2025 09:35 IST

1 / 7
कोणत्याच गोष्टीचा अतिरेक रोपांना सहन होत नाही. जसं जास्त उन्हामुळे रोपं कोमेजून जातात तसंच खूप पाऊस झाला तर त्यामुळेही रोपांचं नुकसान होतं.
2 / 7
मनी प्लांटचंही तसंच आहे. मनीप्लांट हे असं एक रोप आहे जे तुम्ही घरातही ठेवू शकता आणि घराच्या बाहेरही ठेवू शकता. पण त्याला जास्त ऊन आणि पाणी या दोन्ही गोष्टी चालत नाहीत.
3 / 7
पण सध्या खूप पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी मनीप्लांटची पानं पिवळी पडून गळायला सुरुवात झाली आहे. असं तुमच्याही मनीप्लांटच्या बाबतीत होत असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा.
4 / 7
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनीप्लांट आता तुमच्या घरात जिथे थोडं जास्त ऊन असेल त्याठिकाणी नेऊन ठेवा. कारण त्याला उन्हाचीही आवश्यकता असते.
5 / 7
मनीप्लांटची माती खूपच चिकट होऊन तिच्यावर शेवाळं जमा झालं असेल तर ती माती थोडी उकरून भुसभुशीत करून घ्या. यामुळे रोपांना ऑक्सिजन मिळेल.
6 / 7
मनीप्लांटची जी पानं पिवळी पडत आहेत ती काढून टाका. तसेच जिथे कुठे मनीप्लांट खराब झालेला, सडलेला दिसत आहे तो भागही काढून टाका.
7 / 7
मनीप्लांटच्या कुंडीतल्या मातीचा वरचा थर उकरून त्यात थोडं खत घाला. पुन्हा तो चांगला वाढायला लागेल.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीपाऊसखते