Join us

लहानशा कुंडीतही जोमानं वाढणाऱ्या ६ भाज्या, ३० दिवसांत मिळेल ताजी ताजी भाजी घरीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 16:37 IST

1 / 7
गार्डनिंगची आवड असेल तर या काही भाज्या तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये नक्कीच लावू शकता. या भाज्या लावण्यासाठी १० ते १२ इंच कुंंडी पुरेशी ठरते.(6 vegetables You Can Grow in Just 30 Days in your small balcony)
2 / 7
पालकाची भाजीही तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. पालकाच्या बिया तुमच्या शहरातल्या नर्सरीतून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही घेऊ शकता. बिया कुंडीमध्ये लावण्याच्या आधी १० ते १२ तास पाण्यामध्ये भिजत घाला आणि कुंडी ५ ते ६ तास ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा.
3 / 7
कुंडीमध्ये पुदिनाही लावू शकता. पुदिन्याच्या ४ ते ५ काड्या एखाद्या कुंडीमध्ये मातीत खाेचून द्या. खूप जास्त पाणी घालू नका. ३ ते ४ तास ऊन येईल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवा.
4 / 7
पुदिन्याप्रमाणे कोथिंबीरही तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. एकदा कटिंग केल्यानंतर पुन्हा कोथिंबीर वाढत जाते. या रोपालाही पुरेसं ऊन आणि मोजकं पाणी लागतं.
5 / 7
२० ते २५ दिवसांत कुंडीमध्ये मेथीची भाजीही लावता येते. मेथीला खूप चिकट पाणी नको असते. तसेच मेथीला जास्त पाणीही घालू नये.
6 / 7
मोहरीची पानं म्हणजेच सरसों का साग पण तुम्हाला घरातल्याच छोट्याशा कुंडीमध्ये लावता येईल. यासाठी थोडी पसरट आकाराची कुंडी घ्या. मोहरीच्या बिया मातीमध्ये अर्धा इंच खोचून घ्या. दिवसातून एकदा रोज नेमाने थोडंसं पाणी घाला.
7 / 7
टोमॅटोचं रोप पण कुंडीमध्ये लावता येतो. थोडी मोठी आकाराची कुंडी किंवा टब तुम्ही टोमॅटोचं रोप लावण्यासाठी वापरू शकता.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीभाज्या