1 / 8गरमगरम कांदे पोहे नाश्त्याला असले की दुसरं आणखी काय पाहिजे.. बहुसंख्य लोकांना अतिशय आवडणारा हा पदार्थ. अगदी लहान मुलंही पोहे पाहून खूश होतात. त्याच पोह्यांच्या प्रेमापोटी ७ जून हा दिवस जागतिक पाेहे दिवस म्हणून ओळखला जातो.2 / 8पोह्यांचे कितीतरी वेगळे प्रकार आहे. त्यातला सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे कांदेपोहे (kande pohe).. गरमागरम कांद्यापोह्यांचे नाव जरी घेतलं तरी त्याचा सुगंध पोहेप्रेमींच्या नाकात दरवळू लागतो. 3 / 8उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून खाल्ला जाणारा पोह्यांचा एक प्रकार म्हणजे दही पोहे (dahi pohe). पोटाला आणि मनाला थंडावा देण्याचं काम दही पोहे हमखास करतात. 4 / 8दडपे पाेहे हा पाेह्यांचा आणखी एक चवदार प्रकार. ही रेसिपी मुळची कोकणातली. पण आता मात्र ती अख्ख्या महाराष्ट्रातच आवडीने खाल्ली जाते. (dadpe pohe)5 / 8नागपुरी तर्री पोह्यांची तर बातच न्यारी. पोहे आणि त्यावर लालजर्द, झणझणीत तर्री.. अशा थाटातले पोहे एकदा खाऊ पाहायलाच हवेत.6 / 8गुजरातमध्ये बटाटा पोहे प्रसिद्ध आहेत. तिथे पाेह्यांमध्ये आवर्जून बटाटा टाकला जातो.7 / 8इंदोरी पोहे देखील प्रसिद्ध आहेत. ते लोक पोह्यामध्ये एक खास मसाला टाकतात आणि शेव, कच्चा कांदा टाकून पोहे सर्व्ह करतात. पोहे- जिलेबी हा तिथला एक प्रसिद्ध नाश्ताप्रकार आहे.8 / 8एरवी पोहे करण्यासाठी आपण जसे भिजवतो, तसे भिजवायचे. त्या पोह्यांना तेल, तिखट, मीठ, मेतकूट लावायचे आणि वरतून कडिपत्ता, शेंगदाणे, मिरची टाकून फोडणी घालायची. हा पाेह्यांचा प्रकारही अनेकांच्या आवडीचा आहे.