Join us
Daily Top 2 Weekly Top 5

World Milk Day : दूध म्हणजे पूर्णान्न, पाहा दुधाचे ५ पदार्थ - लहानमोठ्या सर्वांना आवडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2025 12:36 IST

1 / 8
दूध हा पदार्थ भारतात घरोघरी प्यायला जातो. मात्र फक्त दुधच नाही तर दुग्धजन्य पदार्थही आवर्जून केले जातात आणि खाल्ले जातात. लहान मुलांना दूध पिणे आई सक्तीचे करते कारण दूध फार पौष्टिक आहे. पण दूध प्यायला मुलांना काही आवडत नाही.
2 / 8
छान गोडाधोडाचे पदार्थ करताना त्यात दूध घातले जाते. तसेच आजकाल तिखट पदार्थांमध्येही दूध घातले जाते. जसे की पास्ता हा सध्या फार लोकप्रिय असलेला इटालीयन पदार्थ दुधाचाच असतो.
3 / 8
काही असे पदार्थ आहेत जे दुधाशिवाय बेचव लागतात. करायला अगदी सोपे असतात. पाहा असे कोणते पदार्थ आहेत.
4 / 8
लहानपणी आई दुधाचे घावन करायची. हा पदार्थ आजकाल फार खाल्ला जात नाही. कोकणातील हा एक खास नाश्त्याचा पदार्थ आहे. तांदळाचे पीठ, दूध , साखर असे पदार्थ घालून ही रेसिपी केली जाते.
5 / 8
दूध आटवून त्यात छान साखर, केशर, वेलची आणि सुकामेवा घालून तयार केलेली गोडसर डिश म्हणजे बासुंदी. दुधाची बासुंदी सणासुदीच्या काळात खास करून केली जाते. तसेच एखाद्या खास प्रसंगी केली जाते.
6 / 8
आपल्याकडे कोणताही पदार्थ वाया जाऊ नये यासाठी अनेक रेसिपी आहेत. नासलेल्या दुधाचे अनेक पदार्थ केले जातात. त्यापैकी एक म्हणजे कलाकंद. साखर वेलची घालून कलाकंद करणे तसे सोपे आहे. हलवायाकडे शक्यतो कलाकंद मिळतोच.
7 / 8
झटपट एखादा गोड पदार्थ करायचा असेल तर डोक्यात लगेच खीर करण्याचा विचार येतो. खीर हा पदार्थ करण्याच्या अनेक पद्धती आहेत. विविध पदार्थ वापरले जातात. मात्र त्यात दूध असतेच. दुधाशिवाय खीर करता येत नाही.
8 / 8
नारळ पोहे हा पदार्थ करायला जेवढा सोपा चवीला तेवढाच मस्त आहे. दुधात पोहे भिजवायचे आणि मग त्याला साखर लावायची. करायला अगदीच सोपी अशी ही रेसिपी एकदा नक्की करुन पाहा.
टॅग्स : दूधअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.