1 / 7world food safety day हा दिवस दर वर्षी ७ जूनला साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे अन्नामुळे होणारे आजार टाळण्यासाठी आणि चांगले अन्न खावे यासाठी जागृकता निर्माण करणे. 2 / 7लोकांनी शेतीचे तसेच अन्न सुरक्षा, आरोग्य, पोषण, चांगला आहार अशा सगळ्या गोष्टींचे महत्व जाणून घ्यावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अन्न हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे अन्न चांगलेच खाणे गरजेचे आहे.3 / 7जागतिक अन्न सुरक्षा दिनाची सुरवात डिसेंबर २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने केली. पहिल्यांदा ७ जून २०१९ रोजी पहिला अन्न दिवस साजरा झाला. आहारात चुकीचे अन्न असेल तर त्याचे धोके कसे ओळखावे या हेतूने हा दिवस साजरा केला जाऊ लागला. 4 / 7काही गोष्टी या दिनानिमित्त शिकायला हव्यात. अन्न दूषित होणार नाही याची कालजी कशी घ्यावी हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.5 / 7अन्न तयार करताना हात स्वच्छ धुवायचे. साबण किंवा हॅण्डवॉश वापरुन हात धुवायचे. तसेच जेवण्याआधीही हात स्वच्छ धुवायचे. 6 / 7रस्त्यावरचे उघडे शिळे अन्न म्हणजे विषच असते. लहान मुलांना आपण असे अन्न आवडीने खायला देतो. मात्र ते खाणे आपल्यासाठीही चांगले नाही. घरी तयार केलेले अन्न खा. स्वच्छ हॉटेलमध्येच अन्न खावे. 7 / 7अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्यायला विसरु नका. ताजे छान अन्न खायचे. जेवण तयार करताना सगळे नियम पाळा आणि खातानाही काळजी घ्या.