Join us

डोसा तव्याला चिकटतो, गोल न होता फाटतो ! ६ ट्रिक्स - आता डोसा तव्याला न चिकटता होईल अगदी परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 09:45 IST

1 / 9
मस्त आणि अगदी परफेक्ट गोलाकार डोसा करणं ही एक कला आहे. डोसा खमंग, कुरकुरीत आणि परफेक्ट यावा असं प्रत्येक गृहिणीला वाटत. पण अनेकदा डोसा करताना (how to make dosa on iron tawa without sticking) तो तव्याला चिकटतो आणि सगळा मूडच खराब होतो.
2 / 9
हॉटेलमध्ये किंवा उडप्याकडे मिळणारा डोसा जितका पातळ, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असतो, तसाच घरी बनवणे अनेकदा (how to make dosa without sticking to pan) अवघड वाटते. बऱ्याचदा पीठ तव्याला चिकटते, डोसा बॅटर नीट तव्यावर पसरत नाही किंवा कुरकुरीत होण्याऐवजी मऊ राहतो.
3 / 9
पण काही सोप्या ट्रिक्स वापरल्या, तर डोसा अजिबात तव्याला चिकटणार नाही. डोसा तव्याला का चिकटतो याची कारणे आणि तो न चिकटण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात. ज्यामुळे डोसा तव्याला न चिकटता कुरकुरीत आणि परफेक्ट बनेल.
4 / 9
डोशाचे पीठ मध्यम कंन्सिस्टंन्सीचे आणि तव्यावर सहज पसरण्यायोग्य असावे. जर पीठ खूप घट्ट झाले, तर डोसा कुरकुरीत होणार नाही. पीठ इतके पातळ असावे की चमच्याने तव्यावर टाकताच ते व्यवस्थित गोलाकार आकारात पसरवता येईल.
5 / 9
डोसा बनवताना तवा योग्य प्रकारे गरम होणे खूप महत्त्वाचे आहे. तवा खूप गरम किंवा खूप थंड नसावा. तवा गरम झाल्यावर त्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा. जर ते लगेच वाफेमध्ये बदलले, तर तवा डोसा बनवण्यासाठी तयार आहे. जर पाणी तसेच राहिले, तर तवा आणखी गरम होऊ द्या. प्रत्येक डोसा बनवण्यापूर्वी तव्यावर थोडे पाणी शिंपडून तो पुसून घ्या. यामुळे तव्याचे तापमान नियंत्रित राहते आणि डोसा चिकटत नाही.
6 / 9
डोसा बनवण्यापूर्वी तव्यावर थोडे तेल लावून ते कांद्याच्या तुकड्याने किंवा पेपर टॉवेलने पसरवा. यामुळे तवा नॉन-स्टिक बनतो आणि डोसा तव्याला न चिकटता अगदी सहज निघतो.
7 / 9
डोसा तव्यावर शिजत असताना गॅस मंद आचेवर ठेवा. यामुळे डोसा आतून व्यवस्थित शिजतो आणि कुरकुरीत होतो. जर आच मोठी असेल तर डोसा लवकर जळतो.
8 / 9
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून तो उलताना किंवा तव्यावरुन काढताना, उलाथनं किंवा ज्या चमच्याचा वापर करत असाल तो हलकासा पाण्यांत भिजवून ओला करावा. या ओलाव्यामूळे डोसा सहज तव्यावरुन काढता येतो.
9 / 9
तवा धुतल्यावर लगेच डोसा घातला तर तो तव्याला चिकटतो. यासाठी, तो आधी नीट कोरडा होऊ द्या. तवा कपड्याने पुसून व्यवस्थित कोरडा करा आणि मगच वापरा.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.