Join us

रोजच्या भात खिचडीसाठी कोणता तांदूळ वापरणं योग्य? बासमती-पुलावासाठी काय वापराल-पाहा तांदळाचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2025 13:48 IST

1 / 8
भारतात राज्यानुसार आहार पद्धती बदलते. राज्यच काय गावोगावी विविध पदार्थ केले जातात. मात्र एक पदार्थ आहे जो सगळीकडे केला जातो. अर्थातच तो पदार्थ म्हणजे भात. घरी तांदूळ असतातच. भारतीय खाद्यसंस्कृतीही भाताशिवाय अपूर्ण आहे.
2 / 8
भात जरी सगळीकडे केला जात असला तरी तांदूळ मात्र विविध प्रकारचा वापरला जातो. आवडीनुसार तांदूळ वापरला जातो. विविध तांदळाच्या प्रकारांची चव वेगळी असते. तसेच त्यांचा चिवटपणा, मोकळेपणा तांदळाच्या प्रकारावर अवलंबून असतो. महाराष्ट्रात आवडीने खाल्ले जाणारे तांदूळ कोणते आहेत जाणून घ्या.
3 / 8
कोलम हा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फार लोकप्रिय आहे. त्यातही विविध प्रकार असतात. जसे की वाडा कोलम, सुरती कोलम, अजरा कोलम काही ठिकाणी लचकारी कोलम असेही म्हटले जाते. कोलम हा सुवासिक आणि लवकर शिजणारा तांदूळ आहे.
4 / 8
बिर्याणीसाठी खास वेगळा तांदूळ वापरला जातो. रोजच्या वापराला तांदूळ बिर्याणीसाठी वापरत नाहीत. छान मोकळा आणि लांबट दाण्यांचा बासमती तांदूळ वापरला जातो. महाराष्ट्रात बासमती रोजच्या आहारात घेतला जात नाही. खास मेजवानी वगैरे असताना हा तांदूळ वापरतात.
5 / 8
आंबेमोहर हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय तांदूळ प्रकार आहे. या तांदूळाचा वास थोडाफार आंब्याचा जो मोहर असतो तसा येतो असे म्हणतात. त्यावरुनच याला आंबेमोहर असे नाव पडले असेही म्हटले जाते. पश्चिम घाटावर हा तांदूळ मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. महान मुलांसाठी पेज वगैरे करण्यासाठी हा तांदूळ छान आहे.
6 / 8
इंद्रायणी नदीच्या नावावरुन इंद्रायणी तांदूळ हे नाव पडले. पुण्याजवळपास हा तांदूळ पिकवला जातो. हा तांदूळ जरा चिकट असतो. शिजवल्यावर तो खिचका होतो. मोकळा होत नाही. मात्र हा तांदूळ फार आवडीने खाल्ला जातो. चवीला तो फार छान असतो. मऊ आणि चिकट भात आवडणाऱ्यांसाठी हा प्रकार खास आहे.
7 / 8
सोना मसुरी हा तांदळाचा प्रकार फार लोकांना माहिती नाही. वजनाला एकदम हलका आणि सुवासिक असा हा तांदूळ भारताच्या दक्षिणेत फार खाल्ला जातो. शिजल्यावर भात मऊ होतो. कर्नाटक आणि तेलंगणा सारख्या ठिकाणी या तांदूळाचे पिक घेतले जाते. मसाले भात, टोमॅटो भात असे पदार्थ करण्यासाठी छान आहे.
8 / 8
तुकडा तांदूळ जरा स्वस्त मिळतो. तांदूळ साफ करताना किंवा त्याची एखादी प्रक्रिया करताना उरलेल्या आणि तुटलेल्या तांदळाला तुकडा तांदूळ म्हणतात. मऊ भात, खिचडी असे पदार्थ करण्यासाठी हा तांदूळ वापरला जातो.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससोशल व्हायरल