अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळते तशी मऊ, लुसलुशीत इडली घरी होण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा? बघा टिप्स..
Updated:November 26, 2025 12:06 IST2025-11-26T11:59:28+5:302025-11-26T12:06:08+5:30

इडली चटणी, इडली सांबार हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. मऊ, लुसलुशीत इडल्या नाश्त्यात किंवा जेवणातही मिळाल्या तर खाणारे कसे तृप्त होऊन जातात.
घरी केलेली इडली कितीही पौष्टिक असली तरी तिला अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या इडलीचा फ्लेवर नसतो. तो घरच्या इडलीला का येत नाही हा प्रश्नही कित्येकदा आपल्या मनात येतोच..
त्याचं उत्तर म्हणजे तांदळात असणारा फरक. इडलीसाठीचा तांदूळ बदलला की त्यापासून तयार होणाऱ्या इडलीची चव आणि टेक्स्चरही बदलतं. म्हणूनच इडलीसाठी कोणता तांदूळ वापरणं जास्त योग्य ठरतं ते पाहूया..
बऱ्याचजणी असं सांगतात की जाडसर असणारा आणि चिकट नसणारा तांदूळ इडलीसाठी परफेक्ट आहे. तर काही जणींच्या मते रेशनच्या दुकानात जो जाडाभरडा तांदूळ मिळतो, त्याच्यापासून तयार होणाऱ्या इडल्या अतिशय चवदार होतात.
हल्ली बाजारात इडलीचा रवादेखील मिळतो. तो वापरूनही तुम्ही इडल्या करू शकता. त्या इडल्याही मऊ, जाळीदार आणि अगदी टम्म फुगलेल्या होतात.