1 / 6काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी काकडी योग्य प्रमाणामध्ये खायलाच हवी. 2 / 6काकडीमधून काही प्रमाणात प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील मिळतं. याशिवाय काकडीमध्ये चांगल्या प्रमाणात ॲण्टीऑक्सीडंट्सही असतात. 3 / 6 काकडी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो, कारण त्यातून भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर मिळतात.4 / 6पण काकडी खाण्याचे एवढे सगळे फायदे असले तरीही ती योग्य वेळीच खायला हवी. याविषयी माहिती सांगताना एक्सपर्ट म्हणतात की काकडी जर तुम्ही सकाळी ११ च्या आधी म्हणजे नाश्त्यामध्ये घेतली तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. काकडी खाण्याची हीच सगळ्यात उत्तम वेळ आहे.5 / 6दुपारच्या वेळी जर जेवणात तुम्ही काकडी खात असाल तर ती अतिशय पाचक ठरते. पचनक्रिया चांगली होण्यासाठी तिची मदत होते. त्यामुळे ज्यांना पचनाच्या समस्या असतात त्यांनी दुपारच्या जेवणात काकडी खाणं योग्य आहे.6 / 6पण रात्रीच्या वेळेस काकडी खाणं मात्र टाळायला हवं कारण ते प्रकृतीसाठी चांगलं नाही.