भाजी, वरण करताना त्यात कोथिंबीर कधी घालावी? बघा खास टिप्स- वाचा कोथिंबीर खाण्याचे फायदे
Updated:February 29, 2024 17:14 IST2024-02-29T17:10:45+5:302024-02-29T17:14:46+5:30

स्वयंपाक करताना रोज लागणारा एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. भाजी, वरण कोणतंही असो. त्यावर कोथिंबीरीची हलकीशी पेरणी केली की त्या पदार्थाला कसा छान सुगंध येतो. (benefits of coriander leaves)
पण कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीर नेमकी कधी घालावी जेणेकरून त्या पदार्थाचा स्वाद आणखी खुलेल आणि कोथिंबीरीचे आरोग्यदायी लाभ शरीराला होतील, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ शेफ स्मिता देव यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये स्मिता देव यांनी कोथिंबीर खाण्याचे फायदेही सांगितले आहेत. त्या म्हणतात की पदार्थांमध्ये कोथिंबीर घातल्याने त्याची ॲसिडिक लेव्हल कमी होते आणि ते पचण्यास सोपे जातात.
आतड्यांमध्ये डायजेस्टिव्ह ज्यूसचे स्त्रवण होण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त ठरते. त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते.
याशिवाय शरीरातील खराब कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यासाठीही कोथिंबीर फायदेशीर आहे.
कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या एक मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा. असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील.