1 / 7गरम मसाला...भाजी, आमटी किंवा कोणत्याही पदार्थात योग्य प्रमाणात पडला तरच मज्जा येते. पदार्थ कोणताही असो त्यात मसाले अगदी योग्य प्रमाणांत पडले तर साध्या पदार्थाची चवही दुपटीने वाढते. याउलट, जर मसाल्याचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तर मग पदार्थ बिघडलाच म्हणून समजा(When Should Garam Masala Be Added While Cooking Vegetables).2 / 7आपण रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये गरम मसाल्याचा (Ways To Use Garam Masala In The Kitchen) आवर्जून वापर करतो. परंतु काहीजणींना पदार्थांत गरम मसाला नेमका कधी आणि कसा घालावा याची कल्पना नसल्याने पदार्थ अनेकदा फसतो. यासाठीच, कोणताही पदार्थ करताना त्यात गरम मसाला नेमका कधी घालावा, कधी घालू नये, कसा व किती घालावा ते पाहूयात. 3 / 7पदार्थ कोणताही असो गरम मसाला नेहमी सगळ्यात शेवटीच घालावा. जेव्हा कोणताही (Why Do We Put Garam Masala At The End Of Cooking) पदार्थ जवळजवळ पूर्ण शिजून होतो, तेव्हा गरम मसाला घालावा. कारण गरम मसाला जास्त वेळ शिजवला, तर त्याची खास चव आणि सुगंध कमी होतो, आणि काहीवेळा चवही कडवट होऊ शकते. शेवटी घातल्याने त्याचा अस्सल सुगंध आणि रंग टिकून राहतो, आणि पदार्थ अधिक चविष्ट लागतो. 4 / 7 गॅसची आच मंद करा आणि पदार्थ पूर्णपणे शिजल्यानंतरच गरम मसाला घाला. चवीनुसार गरम मसाल्याचे प्रमाण ठरवा. मसाला घातल्यानंतर भाजी २ मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवा. नंतर गॅस बंद करा, जेणेकरून मसाल्याचा सुगंध आणि चव व्यवस्थित पदार्थात मिसळेल. 5 / 7जर स्वयंपाक करताना सुरुवातीलाच गरम मसाला घालत असाल, तर ही चूक टाळा. गरम मसाला उष्ण गुणधर्माचा असतो, त्याला जास्त वेळ शिजवू नये. शिजवताना गरम मसाला आधी घातल्यास त्याचा सुगंध उडून जातो, आणि चवही खराब होते.6 / 7 फोडणीत गरम मसाला घालण्याची चूक करु नका. असे केल्यास त्या पदार्थातील सुगंध संपून जातो आणि पदार्थात अनावश्यक उष्णता येते. फोडणीत घातल्यास गरम मसाला जळण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे त्याची चवही बिघडते. 7 / 7एखाद्या पदार्थाला फायनल टच देऊन त्याची चव अधिक खुलवायची असते, तेव्हा गरम मसाला वापरला जातो. कोरड्या भाज्या जसे की बटाटा-फ्राय, भेंडी, वांगी तसेच ग्रेवी असलेल्या भाज्या मटार पनीर, मिसळ, उसळ, बटाटा -टोमॅटो यांसारख्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरला जातो.