Join us

उन्हाळ्यामध्ये काय खावे आणि काय टाळावे? दुर्लक्ष करू नका, खाण्याच्या सवयी महत्त्वाच्याच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2025 20:24 IST

1 / 9
उन्हाळ्यामध्ये खाण्या-पिण्याचे काही नियम पाळावेच लागतात. कारण उष्णतेचा मारा शरीरावर इतका जास्त होत असतो की आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2 / 9
काही पदार्थ असतात जे उन्हाळ्यामध्ये पोटात जायलाच हवेत. तर काही पदार्थ खाणे टाळलेलेच बरे. जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत आणि कोणते नाही.
3 / 9
उन्हाळ्यामध्ये तिखट पदार्थ खाणे टाळावे तिखट पदार्थांमध्ये भरपूर उष्णता असते. उन्हामुळे शरीरातील उष्णता आधीच वाढलेली असते त्यामध्ये उष्ण पदार्थ खाल्यावर शरीराला त्रास होतो.
4 / 9
तिखट पदार्थांऐवजी साधे सात्विक अन्न खावे. भात, डाळ, चपाती, साधी भाजी असा आहार ठेवावा. आन्नामध्ये थंड पदार्थांचा समावेश करावा.
5 / 9
लोणच्यासारखे खारयुक्त पदार्थही जरा कमीच खावे. त्यामध्ये खुप तेल असते. ते तेल घशाशी येते. उलट्याही होतात. लोणच्याऐवजी कोशिंबीर खावी.
6 / 9
फळे हवी तेवढी खा. फळांमुळे शरीराला काही तोटा होत नाही. मात्र पपईसारखी उष्ण फळे खाताना जरा जपूनच खा. आंबा खाणे तर हमखास बाधते, त्यामध्ये उष्णताच तेवढी असते.
7 / 9
काकडी, टोमॅटो सारख्या फळभाज्या उन्हाळ्यात नक्कीच खायला हव्या. त्याचा त्रास होत नाही उलट पोटाला आधारच मिळतो.
8 / 9
उन्हाळ्यामध्ये तळलेले तेलकट पदार्थ खाणे टाळा. पचनासाठी ते चांगले नाहीच तसेच त्वचेसाठीही चांगले नाही.
9 / 9
पेय भरपूर प्या. फळांचे ज्यूस, सरबत, ताक, नारळ पाणी आदी द्रव्ये पित राहा. शरीराला गरजेचा असलेला थंडावा मिळतो.
टॅग्स : समर स्पेशलअन्नआरोग्यआहार योजना