भारतातील सगळ्यात महाग २ भाज्या, एका किलाेची किंमत इतकी की तेवढ्या पैशात येतील मोठे टीव्ही-फ्रीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:31 IST
1 / 7Most Costly Vegetable : भारतात प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या मिळतात. तर काही भाज्या असतात ज्या नेहमीच मिळतात. कधी भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असतात, तर कधी खूपच स्वस्त मिळतात. पण आज आपण भारतात सगळ्यात महाग मिळणाऱ्या दोन भाज्यांबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांची किंमत वाचून नक्कीच तुमची बोबडी वळेल. 2 / 7हॉप शूट्सची किंमत सामान्य माणसाला चकित करणारी आहे. भारतात ही भाजी प्रतिकिलो साधारण ८५ हजार ते १ लाख रुपये दराने विकली जाते. एवढ्या पैशांत लोक दागिने, मोबाईल किंवा इतर महागड्या वस्तू खरेदी करतात, पण ही भाजी त्याहूनही महाग आहे.3 / 7ही भाजी देशातील मोजक्या भागांतच पिकवली जाते. भारतात प्रामुख्याने बिहारमधील औरंगाबाद जिल्हा आणि हिमाचल प्रदेशातील किन्नौर परिसरात हॉप शूट्स आढळतात. डोंगराळ भागातील थंड हवामान आणि खास माती या पिकासाठी अतिशय योग्य मानली जाते.4 / 7हॉप शूट्सची शेती करणे अत्यंत कठीण आहे. ही भाजी इतर सामान्य भाज्यांसारखी सरळ ओळीत उगवत नाही. प्रत्येक रोप वेगळे ओळखून शेतकऱ्यांना हातानेच कोंब तोडावे लागतात. या प्रचंड मेहनतीमुळे आणि वेळेमुळेच तिची किंमत गगनाला भिडते.5 / 7या भाजीमध्ये असे नैसर्गिक घटक असतात, ज्यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. तज्ज्ञांच्या मते, हॉप शूट्समधील घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि आजारांशी लढण्यास मदत करतात. त्यामुळेच या भाजीचे मूल्य आणखी वाढते.6 / 7हॉप शूट्सनंतर गुच्छी मशरूम ही देखील अत्यंत महागडी भाजी मानली जाते. बाजारात गुच्छी मशरूम साधारण ३० ते ४० हजार रुपये प्रतिकिलो दराने विकली जाते. तिचा खास स्वाद आणि सुगंध यामुळे हॉटेल्स आणि बाजारात तिची मोठी मागणी असते. 7 / 7गुच्छी मशरूम नैसर्गिकरित्या डोंगराळ जंगलात उगवते. ती प्रामुख्याने काश्मीर खोरे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि नेपाळ सीमेवरील जंगलांमध्ये आढळते. ही मशरूम पिकवली जात नाही, तर जंगलातून गोळा केली जाते. त्यामुळेच तिची किंमत इतकी जास्त असते.