marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

Updated:June 27, 2025 19:48 IST2025-06-26T19:40:58+5:302025-06-27T19:48:18+5:30

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

कोकण, विदर्भ, खान्देश या प्रांताना जशी आपापली खाद्यसंस्कृती आहे, तशीच ती मराठवाड्यालाही आहे.

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

मराठवाडी जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते थोडेसे तिखट, मसालेदार असते. मिळमिळीत, गुळगुळीत पदार्थ अस्सल मराठवाडी लोकांना तसे जरा कमीच आवडतात..

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

मराठवाड्यातला एक पारंपरिक पदार्थ म्हणजे ताकातले किंवा दह्यातले धपाटे, चटणी आणि तोंडी लावायला कांदा. मराठवाडी माणूस प्रवासाला निघाला की हे ताकातले धपाटे आठवणीने सोबत घेतो.

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

रात्रीच्या जेवणात वन डीश मील हवं असेल तर मराठवाडी लोक उकड शेंगोळे करतात. यांना तुम्ही हवं तर इंडियन पास्ताही म्हणू शकता. ज्वारी, गहू आणि हरबरा डाळ यांच्या पिठापासून शेंगोळे केले जातात.

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

असाच वन डिश मील प्रकारातला आणखी एक आंबटगोड पदार्थ म्हणजे वरणफळं. दुपारचं वरण जास्त उरलं असेल तर त्याला छान चिंचगुळाची फोडणी घालून मराठवाड्यातले लोक रात्रीच्या जेवणात वरणफळाचा बेत करतात आणि त्यावर आवडीने ताव मारतात.

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

झणझणीत ठेचा करावा तर तो मराठवाड्यातल्याच एखाद्या सुगरणीने. हल्ली तिखट खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ठेच्यामध्ये दाण्याचा कूट काही ठिकाणी घातला जातो. पण टिपिकल मराठवाडी ठेच्यात मात्र लसूण आणि हिरव्या मिरच्याच जास्त असतात.

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

मराठवाड्याचा आणखी एक पारंपरिक पदार्थ म्हणजे पोळ्याला पुरणपोळीसोबत केली जाणारी काळ्या मसाल्यातली रश्शी.. रश्शी आणि पुरणपोळी हा बेत म्हणजे आहाहा...

marathwada special food : मराठवाड्यातल्या पदार्थांची झणझणीत मेजवानी, खा मराठवाड्यातले अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ

बाजरीच्या थापून केलेल्या खारोड्याही मराठवाड्यातच दिसतात. मराठवाडा सोडून इतर प्रांतात त्याचे वडे तोडले जातात.