२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

Published:December 12, 2023 07:23 PM2023-12-12T19:23:49+5:302023-12-12T19:30:29+5:30

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

एखादा पदार्थ कोणाला विचारून करण्यापेक्षा त्याची रेसिपी गुगलवर शोधून तो पदार्थ करणं आता काही नविन राहिलेलं नाही. लॉकडाऊनपासून तर हा ट्रेण्ड खूपच जास्त वाढला आहे. त्यानुसार २०२३ या वर्षांत कोणत्या पदार्थांच्या रेसिपी गुगलवर सर्वात जास्त शोधल्या गेल्या याची एक यादी गुगलने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

हिंदुस्थान टाईम्स यांनी दिलेल्या या यादीनुसार गुगलवर सगळ्यात जास्त शोधला गेलेला पदार्थ आहे आंब्याचं लोणचं. चटकदार, चटपटीत आंब्याचं लोणचं हा उन्हाळ्यातला एकदम हिट पदार्थ आहे.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

दुसरा पदार्थ आहे Sex on the beach या मॉकटेल ड्रिंकची रेसिपी.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

तिसऱ्या क्रमांकावर शोधला गेलेला पदार्थ आहे पंचामृत. आपल्याकडे कोणत्याही पुजेसाठी पंचामृत लागतंच. दूध, दही, तूप, गूळ, मध हे पाच पदार्थ असणारे पंचामृत कसे करतात, याबाबत बहुसंख्य लोकांच्या मनात उत्सूकता दिसून आली.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

त्या पाठोपाठ Hakusai या जपानी पदार्थाची रेसिपी शोधली गेली. हा एक जपानी लोणच्याचा प्रकार आहे.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

पाचव्या क्रमांकावर आहे धनिया पंजिरी. ही पंजिरी कशी करायची, तिचे आरोग्याला फायदे काय असा बराच शोध गुगलवर घेतला गेला आहे.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

दिवाळी, गणपती, होळी या सणांच्या दिवसांमध्ये करंजीची रेसिपीही अनेकांनी शोधली.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

Thiruvathirai Kali हा दाक्षिणात्य पदार्थ सातव्या स्थानावर आहे. मुगाच्या डाळीच्या शिऱ्यासारखीच ही रेसिपी असून दक्षिण भारतात हा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून देवाला दाखविला जातो.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

त्या खालोखाल Ugadi Pachadi या पदार्थाचा शोध घेण्यात आला. हा पदार्थ आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या भागात सणसमारंभांना केला जातो. आंबट, तुरट, गोड अशी संमिश्र चव असणारा हा पदार्थ आहे.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

Kolukattai या पदार्थाचा त्यानंतर क्रमांक येतो. दिसायला आणि रेसिपीनुसार हा पदार्थ आपल्या उकडीच्या मोदकाप्रमाणेच आहे.

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० रेसिपी, बघा आणि सांगा तुम्हीही या रेसिपी शोधल्या होत्या का?

त्यानंतर दहाव्या क्रमांकावर असणारा पदार्थ आहे बहुसंख्य महाराष्ट्रीयन लोकांचे आवडीचे असणारे रव्याचे लाडू...