भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

Published:January 10, 2024 01:13 PM2024-01-10T13:13:44+5:302024-01-10T15:19:00+5:30

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

आपण जसे पिझ्झा, नूडल्स, चॉकलेट्स असे परदेशी पदार्थ मोठ्या प्रेमाने खातो, तसंच आपल्याकडचे काही पदार्थही परदेशी लोक मोठ्या आवडीने खातात. आपल्याकडच्या गोड पदार्थांचा गोडवा चाखण्यासाठी तर जगभरातील कित्येक खवय्ये उत्सूक आहेत.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

tasteatlas यांनी 100 most legendary dessert places in the world अशी एक खादी नुकतीच प्रसिद्ध केली असून त्यात १० भारतीय गोड पदार्थांचा समावेश आहे.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

या यादीमध्ये सगळ्यात आधी म्हणजेच १८ व्या क्रमांकावर येणारा गोड पदार्थ आहे पुण्याच्या कयानी बेकरीचा मावा केक.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

रसगुल्ला... बस्स नाम ही काफी है.. नुसतं नाव ऐकूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. या यादीत २५ व्या क्रमांकावर आहे कोलकत्याच्या के. सी. दास येथील रसगुल्ला.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

रसगुल्ल्याच्या खालोखाल २६ वा नंबर पटकावला आहे कोलकत्याच्या रम बॉल्सनी. कोलकताला कधी गेलात तर हे दोन पदार्थ खायला विसरू नका.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

यानंतर २९ व्या क्रमांकावर आहेत हैद्राबादच्या कराची बेकरीतील फ्रुट बिस्किट्स

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

कोलकत्याच्या गोड पदार्थांनी खरोखरच या यादीमध्ये बाजी मारली आहे. पुन्हा एकदा ३७ व्या क्रमांकावर बी ॲण्ड आर मुलीकची संदेश नावाची मिठाई आहे.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

४९ व्या क्रमांकावर आहे मुंबई येथील के. रुस्तम यांचे आईस्क्रिम सॅण्डविच.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

दिल्लीच्या कॅरेमल कुल्फीनेही या यादीमध्ये ६७ वे स्थान पटकावले आहे.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

लखनौला कधी जाणं झालं तर तिथल्या प्रकाश कुल्फीमध्ये मिळणारा कुल्फी फालूदा खायला विसरू नका. या यादीमध्ये कुल्फी फालुदा ७७ व्या क्रमांकावर आहे.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

चितळेंची बाकरवडी हा पुणेकरांसाठी अगदी मानाचा पदार्थ. बाकरवडी काही गोड नसते. पण या यादीमध्ये ८५ व्या क्रमांकावर बाकरवडीची वर्णी लागली आहे.

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

नवी दिल्ली येथील जलेबीवाला येथे मिळणारी जिलेबी या यादीमध्ये ९३ व्या क्रमांकावर आहे.