Join us

भाजीत तेल जास्त झाले? ४ सोपे उपाय- पदार्थ बिघडणार नाही, होईल अधिक चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2025 19:00 IST

1 / 7
अनेकदा भाजी बनवताना आपला तेल घालण्याचा अंदाज चुकतो. यामुळे भाजी खूपच तेलकट आणि चिकट होते. चवीला खराब नाही पण आरोग्यासाठी इतके तेल चांगले नाही. (reduce oil in vegetables easily)
2 / 7
ग्रेव्ही भाज्यांमधून तेल कमी करण्यासाठी बर्फाचा अनेकदा वापर केला जातो. परंतु, सुक्या भाज्यांमधून तेल काढताना काय करावं सुचत नाही. (healthy cooking tips at home)
3 / 7
जर आपल्याकडूनही सुक्या भाज्यांमध्ये तेल जास्तीचे पडले तर घाबरू नका. सोपे उपाय केल्यास पदार्थ बिघडणार नाही.
4 / 7
पॅनमध्ये भाजी शिजवल्यानंतर मध्यभागी लहान वाटी ठेवा. ज्यामुळे जास्तीचे तेल वाटीच्या खाली जमा होईल. नंतर चमच्याच्या मदतीने तेल काढा.
5 / 7
तेल शोषण्यासाठी आणि टिश्यू पेपर किंवा किचन टॉवेलचा वापर करु शकतो. टिश्यू पेपर ताटात पसरवून त्यावर भाजी पसरवा. यामुळे अतिरिक्त तेल पेपर शोषून घेईल.
6 / 7
ब्रेडचे तुकडे किंवा पाव हा टिश्यू पेपरसाठी चांगला पर्याय आहे. भाजी एका भांड्यात काढून त्यावर ब्रेडचे काही छोटे तुकडे करुन पसरवा. यामुळे तेल शोषले जाईल.
7 / 7
जर भाजी थोडी घट्ट करायचे असेल तर आपण त्यात बेसन किंवा गव्हाचे पीठ घालू शकतो. पॅनमध्ये १ ते २ चमचे बेसन किंवा गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या. त्यावंतर भाजीमध्ये घाला. ज्यामुळे भाजीतील अतिरिक्त तेल निघून जाईल.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.