Join us

Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 20:20 IST

1 / 11
श्रावण महिन्यात उपवास आणि सणवाराच्या निमित्ताने चविष्ट (To Make Perfect Tasty Aluvadi Tips & Tricks) पारंपरिक पदार्थांची रेलचेल प्रत्येक घरोघरी असतेच. त्यातही (how to make perfect aluvadi at home) अळूवडी ही एक हमखास तयार केली जाणारी पारंपरिक डिश आहे.
2 / 11
अळूच्या पानांची खमंग चव, त्यावर लावलेले मसाल्यांचे (aluvadi making tricks) वाटण आणि कुरकुरीत तळणी हे सगळं अगदी तोंडाला पाणी (aluchi vadi recipe secrets) आणणारंच असत! पण अनेक वेळा अळू वडी करताना ती फुटते, चिकट होते किंवा पान कडवट लागतं. अशा चुका टाळून अळू वडी अगदी परफेक्ट होण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात...
3 / 11
अळूवडी करताना अळूची पानं नेहमी कोवळीच निवडा. जुनी पानं वापरल्यास, वडी तोंडात विरघळतच नाही. वडी साठी नेहमी नाजूक आणि ताजीच पानं घ्यावीत.
4 / 11
बेसनाचा थर जितका पातळ, तितकी वडी हलकी. खूप जाड बेसन लावलं, तर वडी घट्ट आणि चिकट होते. बेसन पीठ हलकं, पातळसर थर आणि व्यवस्थित पसरवून पानांना लावा. बेसनाचं मिश्रण खूप पातळ किंवा खूप जाड, घट्ट न करता मध्यम कंन्सिस्टंन्सीचे करावे. योग्य घट्टपणा राखल्यास पानाला छान लावता येते आणि वडी तळताना फुटत नाही.
5 / 11
जर अळूची वडी मऊ नको, कुरकुरीत हवी असेल तर बेसन पिठात थोडं तांदळाचं पीठ मिक्स करून पानांना लावा. यामुळे वडी मऊ न होता अगदी परफेक्ट कुरकुरीत होईल.
6 / 11
अळूच्या वडीला फक्त चवच नको तर खमंग सुगंधसुद्धा पाहिजे असेल तर मग आलं-लसूण पेस्ट आणि गरम मसाला बेसन पिठात घालवा. हे सगळं पिठात घालताच वड्यांचा खमंग सुगंध संपूर्ण घरभर दरवळत राहतो.
7 / 11
अळू वडीसाठी लांबट आणि पातळ अळूच्या पानांचा वापर करावा ही पाने कमी कडवट आणि चवदार असतात. फार मोठी किंवा फार लहान पाने वापरू नयेत, मध्यम आकाराची, हिरवीगार पाने उत्तम.
8 / 11
अळूची वडी करताना पानांच्या पाठीमागच्या शिरा नीट कापून टाका. त्यामुळे वडी वळताना फाटत नाही आणि सहज वळते.
9 / 11
वडी वळल्यानंतर गरम वाफेवर नीट शिजवा. वाफ नीट बसली नसेल, तर वडी चिकट होते आणि आतून कच्ची राहते.
10 / 11
वड्या वाफवून घेतल्यानंतरच कापा. गरम असताना कापल्यास वडी फुटते, पण थंड झाल्यावर सुंदर चकत्या होतात.
11 / 11
वड्या तळताना मंद आचेवरच खरपूस तळून घ्याव्यात. फार मोठ्या आचेवर तळल्यास बाहेरून भाजलेली आणि आतून कच्ची राहू शकते.
टॅग्स : अन्नपाककृतीश्रावण स्पेशलश्रावण स्पेशल पदार्थ