Join us

बटाटे उकडताना फुटतात, लगदा होतो? ८ टिप्स - बटाटे उकडण्याची परफेक्ट पद्धत, काम होईल झटपट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 20:24 IST

1 / 11
स्वयंपाक घरातील बटाटा हा असा एक पदार्थ आहे जो प्रत्येकजण (How to Keep Potatoes from Falling Apart While Boiling) आनंदाने खातो. बटाट्याचे पराठे, टिक्की, भाजी असे सगळेच पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. शक्यतो, बटाट्याचे कोणतेही पदार्थ करायचे म्हटलं की बटाटा सगळ्यातआधी उकडवून घ्यावा लागतो. परंतु बटाटे उकडणे सोपे काम वाटत असले तरी, ते उकडताना काळजी घ्यावीच लागते(Tips & Tricks How To Prevent Potatoes From Falling Apart While Boiling Know 7 Useful Hacks).
2 / 11
काहीवेळा बटाटे कच्चेच राहतात तर कधी त्यांचा अगदी लगदा होतो. इतकंच नाही तर (Potatoes Boiling 7 Useful Kitchen Tips) काहीवेळा सालं निघून ते जास्त उकडले जाऊन पचपचीत होतात. यामुळे अशा बटाट्यांचे पदार्थ केल्यास त्या पदार्थांच्या चवीवर देखील परिणाम होतोच.
3 / 11
यासाठीच, बटाटे उकडताना ते फुटू नयेत, त्यांचा लगदा होऊ नये किंवा ते उकडून अगदी पचपचीत होऊ नये यासाठी, बटाटे परफेक्ट पद्धतीने उकडवून घेण्यासाठी ७ टिप्स लक्षात ठेवा.
4 / 11
१. काहीजण बटाटे आधीच गरम करून ठेवलेल्या पाण्यात उकडवण्यासाठी टाकतात. त्यामुळे बटाट्याचा बाहेरील भाग लवकर शिजतो आणि तो आतून कच्चा राहतो आणि तुटतो. अशी चूक कधीही करू नका. बटाटे नेहमी नॉर्मल पाण्यात टाकून उकळा. यामुळे ते आतून आणि बाहेरून समान रीतीने शिजतात. याचबरोबर, बटाटे नेहमी कुकरमध्येच उकडवून घेणे फायदेशीर ठरेल.
5 / 11
२. जर बटाटे कमी असतील तर प्रथम कुकरमध्ये नॉर्मल पाणी घाला. त्यात एक स्टीलची वाटी ठेवा आणि त्यात बटाटे उकळण्यासाठी ठेवा. यामुळे बटाटे पाणी शोषून घेणार नाहीत आणि ते न तुटता अगदी पटकन उकडले जातील.
6 / 11
३. मीठ हा स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. मीठ केवळ पदार्थांची चवच वाढवत नाही तर स्वयंपाक करताना मिठाचे अनेक उपयोग देखील केले जातात. जर बटाटा उकडताना तुटू नये म्हणून कुकरमधील पाण्यात चिमूटभर मीठ घालावे. यामुळे बटाट्याचे बाहेरील आवरण कडक होते आणि उकडताना तो तुटत नाही.
7 / 11
४. जर बटाटे गरजेपेक्षा जास्त उकडले असतील आणि त्यांचा बाहेरचा भाग तुटू लागला असेल, तर ते गरम पाण्यातून बाहेर काढा आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे ते घट्ट होतील आणि त्यांचा बाहेरचा भाग तुटणार नाही. याशिवाय, बटाटे उकडवून आपण ते बर्फाच्या पाण्यात देखील ठेवू शकता. यामुळे बटाटे शिजण्याची प्रक्रिया थांबेल आणि ते अधिक जास्त उकडले जाऊन पचपचीत होणार नाही.
8 / 11
५. बरेचदा प्रेशर कुकरमध्ये जास्त बटाट्यांसोबतच जास्त प्रमाणांत पाणी देखील घातले जाते, अशी चूक करु नका. बटाट्यांमध्ये फक्त तेवढेच पाणी घाला जे फक्त ४ शिट्ट्यांपुरतेच मर्यादित असेल. बटाटे नेहमी मध्यम आचेवर उकड्ण्यासाठी ठेवा यामुळे बटाटे कधीही फुटणार नाहीत. जर बटाटे कमी असतील तर ते उकडण्यासाठी फक्त एकच शिट्टी पुरेशी आहे.
9 / 11
६. जर बटाट्याची साल उकडताना फाटू नये यासाठी, ते उकडवण्यापूर्वी त्याच्या सालींवर थोडे तेल लावा. तेल लावून हे बटाटे थोड्यावेळासाठी बाजूला तसेच ठेवून द्या आणि नंतर ते उकडण्यासाठी कुकरमध्ये घाला. यामुळे बटाट्याची साल निघत नाही आणि ते जास्त उकडले जात नाही.
10 / 11
७. मिठाप्रमाणेच, बटाटे उकडताना त्यात थोडे व्हिनेगर घातल्याने बटाटे उकडवल्यानंतरही त्यांचा आकार न बदलता आहे तसाच टिकून राहतो. बटाटे उकडण्यापूर्वी पाण्यात १ चमचा व्हिनेगर घाला. याशिवाय, थोडासा बेकिंग सोडा देखील पाण्यांत घातल्यास बटाटे उकडताना फुटत नाहीत.
11 / 11
८. याशिवाय, बरेचदा आपण वेगवेगळ्या आकाराचे बटाटे एकत्र उकडतो, यामुळे लहान बटाटे लवकर शिजतात आणि मोठे बटाटे उशिरा शिजतात. नेहमी समान आकाराचे बटाटे उकडा यामुळे ते फुटणार नाहीत.
टॅग्स : अन्नपाककृतीकिचन टिप्सबटाटा