अळूची भाजी-वडी खाल्ली की घशात खवखव? ७ टिप्स- श्रावणात भरपूर खा अळूचे पदार्थ...
Updated:July 28, 2025 18:32 IST2025-07-28T18:17:43+5:302025-07-28T18:32:38+5:30
Tips to Remove Itching from Arbi Leaves : how to remove itching from arbi leaves : arbi leaves itching remedy : Aluchya Pananchi Khaj Kashi Kadhavi : arbi leaf irritation home remedy : अळूच्या पानांची खाज पूर्णपणे घालवून, अळूची भाजी - वड्या - फदफदं यांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.

पावसाळ्यात रानभाज्या खाण्याची मज्जा काही औरच असते, आणि यातही अळूची भाजी (Tips to Remove Itching from Arbi Leaves) अनेकांना आवडते. श्रावणात शक्यतो अळूच्या पानांची वडी, अळूची भाजी किंवा अळूचं फदफदं प्रत्येक घरोघर हमखास केलं जात. हे पदार्थ चवीला जितके रुचकर लागतात, तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. पण अळूची भाजी करताना किंवा खाताना बऱ्याचदा अनेकांना खाज सुटण्याचा अनुभव येतो.
विशेषतः अळूची पाने चिरताना किंवा ती व्यवस्थित न शिजवल्यास ( how to remove itching from arbi leaves) घशाला आणि हातांना खाज सुटते. या खाजेमुळे अनेकजण अळूची भाजी खाणे टाळतात. परंतु काही सोप्या टिप्स वापरून आपण अळूच्या पानांची ही खाज पूर्णपणे घालवून या चविष्ट भाजीचा आस्वाद घेऊ शकतो. अळूच्या पानांमधील खाज कशी दूर करावी यासाठी काही खास टिप्स पाहूयात...
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्झलेट (Calcium Oxalate) नावाचे घटक भरपूर प्रमाणांत असतात, ज्यामुळे अळूच्या पानांना (Aluchya Pananchi Khaj Kashi Kadhavi) खाज सुटते. हे घटक निष्क्रिय करण्यासाठी घरगुती सोपे उपाय पाहा.
१. चिंच - कोकमचा वापर :-
अळूची भाजी किंवा वड्या करताना त्यात चिंचेचा (Tamarind) कोळ किंवा कोकम (Kokum) घाला. चिंच आणि कोकममधील आंबटपणा कॅल्शियम ऑक्झलेटचे प्रमाण कमी करतो, ज्यामुळे खाज सुटत नाही. भाजी शिजवताना चिंच किंवा कोकमचा वापर करणे हा सर्वात सोपा आणि पारंपरिक उपाय आहे.
२. आंबट ताक किंवा दही :-
अळूची पातळ भाजी किंवा आमटी तयार करताना तर त्यात थोडे आंबट ताक (Sour Buttermilk) किंवा दही (Curd) घाला. यामुळे भाजीला छान चव येते आणि खाजही कमी होते.
३. लिंबाचा रस :-
अळूची भाजी चिरण्यापूर्वी हातांना थोडे तेल (Oil) किंवा लिंबाचा रस (Lemon Juice) लावा. त्यामुळे हातांना खाज सुटणार नाही. तसेच, भाजी शिजवल्यानंतर सर्व्ह करताना त्यावर थोडा लिंबाचा रस पिळल्यास घशाला येणारी खाजही कमी होते.
४. व्यवस्थित शिजवणे फायद्याचे :-
अळूची भाजी किंवा वड्या नेहमी चांगल्या प्रकारे शिजवा. अपुऱ्या शिजवल्यास खाजेची समस्या वाढते. प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास ती व्यवस्थित शिजते आणि खाज येत नाही.
५. मीठाचा वापर :-
अळूची पाने चिरल्यानंतर त्यांना थोडे मीठ लावून ठेवा आणि काही वेळाने धुवा. यामुळे खाज कमी होण्यास मदत होते.
६. योग्य पानांची निवड :-
अळूच्या पानांचा कोणताही पदार्थ करताना सर्वातआधी योग्य पानांची निवड करावी. यासाठी हिरवीगार, ताजी आणि डाग नसलेली पाने निवडा. त्यांचे देठ कापून टाका आणि पाने वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुवा. याचबरोबर, काहीवेळ पाने पाण्यात भिजत ठेवा, यामुळे त्यातील ऑक्सलेट (Oxalate) निघून जातात.
७. पानं उकडवून घ्या :-
कोणताही पदार्थ करण्याआधी पाने जोपर्यंत पूर्णपणे मऊ होत नाहीत तोपर्यंत १० ते १५ मिनिटे उकळा. यामुळे त्यातील विषारी घटक नष्ट होतात. उकडलेल्या पानांचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी करु शकता.