1 / 9'आलं-लसूण पेस्ट' हा आपल्या नेहमीच्या स्वयंपाकात लागणारा एक (tips to preserve ginger garlic paste longer) महत्त्वाचा पदार्थ. कोणतीही भाजी, ग्रेव्ही किंवा डाळ, आमटी असो तिचा सुगंध आणि चव वाढवण्यासाठी आलं-लसूण पेस्टचा वापर नेहमीच केला जातो. ही रोजच्या (homemade ginger garlic paste storage hacks) वापरात लागणारी पेस्ट बहुतेकवेळा आपण एकदाच पुरेशी तयार करून स्टोअर करतो. पण ही पेस्ट घरी तयार केल्यानंतर, ती काही दिवसांतच हिरवी पडते किंवा चव बदलून खराब होते. त्यामुळे, ताजी, सुवासिक आलं-लसूण पेस्ट कशी तयार करावी आणि ती तयार केल्यानंतर दीर्घकाळ चांगली टिकवून ठेवण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत ते पाहूयात... 2 / 9१. आलं - लसूण पेस्ट तयार करण्यासाठी आलं १०० ग्रॅम, लसूण १५० ग्रॅम, व्हिनेगर १ टेबलस्पून इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. पेस्ट तयार करताना आलं आणि लसूण यांचे प्रमाण नेहमी १:१ (म्हणजे आलं १ वाटी तर लसूण १ वाटी) किंवा १:२ (आलं १ वाटी तर लसूण २ वाटी) ठेवावे. १:२ या योग्य प्रमाणामुळे आलं - लसूण पेस्ट खराब न होता दीर्घकाळ चांगली टिकून राहते.3 / 9२. पेस्ट करताना मिक्सरमध्ये पाणी न घालता, तेलाचा वापर करावा. तेलामुळे पेस्टची नैसर्गिक चव आणि रंग चांगला टिकून राहतो.4 / 9३. पेस्टमध्ये मीठ घालणे आवश्यक आहे. मीठ नैसर्गिकरित्या प्रिझर्व्हेटिव्हचे काम करते, ज्यामुळे पेस्ट जास्त काळ टिकते.5 / 9४. पेस्ट तयार करताना प्रत्येक १ वाटी पेस्टसाठी १ चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळा. व्हिनेगर किंवा लिंबाचा रस पेस्टचा रंग हिरवा पडण्यापासून किंवा बुरशी येण्यापासून वाचवतात.6 / 9५. आलं - लसूण पेस्ट एका एअर-टाइट काचेच्या कंटेनर किंवा बरणीत भरून ठेवा. बरणीचे झाकण लावण्यापूर्वी पेस्टच्या वरच्या पृष्ठभागावर १/२ इंच जाड तेलाचा थर तयार करा. तेलाचा हा थर पेस्टला हवेच्या संपर्कात येण्यापासून वाचवतो, ज्यामुळे ती खराब होत नाही.7 / 9६. पेस्ट जास्त प्रमाणात तयार केली असल्यास, ही पेस्ट आइस-ट्रेमध्ये लहान क्युब्सच्या स्वरूपात भरून फ्रीझ करा. क्युब्स गोठल्यावर एका झिपलॉक बॅग किंवा कंटेनरमध्ये काढून फ्रीझरमध्ये ठेवा. प्रत्येक वेळी फक्त आवश्यकतेनुसार एक क्युब वापरता येतो.8 / 9७. पेस्ट काढण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करा. ओला चमचा वापरल्यास पेस्ट लवकर खराब होऊ शकते. 9 / 9८. आलं - लसणाची पेस्ट तयार करताना त्यात चिमूटभर हळद घालावी. हळदीत नैसर्गिक अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे पेस्टवर बुरशी येत नाही.