उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

Updated:January 19, 2026 18:18 IST2026-01-19T10:30:00+5:302026-01-19T18:18:39+5:30

tips and tricks to make perfect medu vada :: बाहेरून कुरकुरीत आतून कापसासारखे मऊ! पाहा उडपी हॉटेलमध्ये मेदूवडा तयार करण्याची खास पद्धत...

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये 'मेदूवडा' हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. सांबार आणि (tips and tricks to make perfect medu vada) खोबऱ्याच्या चटणीसोबत गरमागरम वडा खाण्याची मजा काही वेगळीच असते. अनेकदा आपण घरी मेदू वडे मोठ्या हौसेने करतो, पण ते हॉटेलसारखे कुरकुरीत होत नाहीत किंवा खूप तेलकट होतात. कधी वड्यांचा आकार बिघडतो, तर कधी ते आतून कच्चे राहतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

जर आपल्याला घरच्याघरीच हॉटेलसारखे मेदू वडे बनवायचे असतील तर उडीद डाळ (perfect udpi medu vada making tips) भिजवण्यापासून ते बॅटर फेटण्याच्या पद्धतीपर्यंत काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास अगदी हॉटेलसारखे परफेक्ट मेदू वडा घरीच तयार करता येतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

जर तुम्हालाही घरच्याघरीच हॉटेलसारखे परफेक्ट, बाहेरून कुरकुरीत आणि आतून (south indian hotel style medu vada) कापसासारखे मऊ मेदू वडे बनवायचे असतील तर या काही खास टिप्स लक्षात ठेवा.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

उडीद डाळ किमान ४ ते ५ तास भिजवा. जास्त वेळ भिजवल्यास वडे जास्त तेल पितात, त्यामुळे वेळेचे योग्य भान ठेवा.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

मिक्सरमध्ये डाळ वाटताना पाण्याचा खूप कमी वापर करा. मेदू वड्याचे बॅटर घट्ट असेल तरच वड्यांना छान आकार येतो आणि ते कुरकुरीत होतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

मिक्सरमध्ये वाटलेले पीठ एकाच दिशेने किमान ५ मिनिटे फेटा. पीठ हलकं झालं की नाही हे पाहण्यासाठी पाण्याच्या वाटीत पिठाचा गोळा टाकून पहा, तो तरंगला पाहिजे तरच बॅटर व्यवस्थित तयार आहे असे समजावे. मेदू वड्याचे बॅटर एकाच दिशेने हाताने फेटल्यामुळे बॅटरमध्ये हवा जाते आणि वडे हलके व फुलके होतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

मेदू वड्याच्या बॅटरमध्ये २ चमचे बारीक रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा. यामुळे वड्यांना बाहेरून अप्रतिम क्रिस्पी लेअर येते आणि वडे कुरकुरीत होतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

मीठ नेहमी वडे तळण्याच्या अगदी आधी घाला. वडे तयार करण्याच्या खूप आधी मीठ घातल्यास पिठाला पाणी सुटते आणि वडे तेलकट होतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

तेल आधी कडकडीत गरम करा आणि वडे सोडल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. यामुळे वडे आतून कच्चे राहत नाहीत आणि बाहेरून जळत नाहीत. तेल फार गरम किंवा थंड नसावे. मध्यम आचेवर वडा तळल्यास ते आतपर्यंत शिजून कुरकुरीत होतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

कढईत एकाचवेळी जास्त प्रमाणांत वडे घातल्यास तेलाचे तापमान कमी होते आणि वडे तेलकट होतात.

उडपी हॉटेलांत मिळतो तसा मेदूवडा करण्यासाठी १ खास ट्रिक, पारंपरिक चवीचा मेदूवडा खा पोटभर

मेदू वड्यांना आकार देताना हाताला थोडे पाणी लावा, जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही आणि मध्यभागी छिद्र पाडणे सोपे जाईल. हाताला पाणी लावून वडा आकार दिल्यास ते नीट गोल होतात आणि फुटत नाहीत.