Join us

कुकरची शिट्टी होताच आतलं पाणी फसफसून बाहेर येतं? ३ टिप्स- कुकरच्या शिट्ट्या होतील मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2025 16:05 IST

1 / 5
कुकरची शिट्टी झाली की वरणातलं किंवा कुकरमध्ये जो कोणता पदार्थ असेल त्यातलं पाणी शिट्टीतून बाहेर येतं. त्यामुळे मग कुकरचं झाकण, गॅस शेगडी, ओटा असं सगळंच खराब होऊन जातं.
2 / 5
असं होऊ नये म्हणून या काही टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगाला येऊ शकतात..
3 / 5
पहिली गोष्ट म्हणजे कुकरचं झाकण लावण्यापुर्वी शिट्टीच्या आतल्या बाजुने थोडं तेल लावा.
4 / 5
दुसरी गोष्ट म्हणजे जर कुकरमध्ये डाळ, तांदूळ, राजमा, चणे शिजवायला लावणार असाल तर त्यामध्ये थोडं तेल घाला. असं केल्यानेही त्यातलं पाणी शिट्टीसोबत बाहेर येत नाही.
5 / 5
कुकर लावल्यावर गॅसची फ्लेम नेहमी मध्यम असावी. मोठी फ्लेम करून अन्न शिजवल्यावर बऱ्याचदा शिट्टीतून पाणी बाहेर येतं.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स