तूप रवाळ व दाणेदार होणारच! तूप करताना लक्षात ठेवा ५ पारंपरिक खास टिप्स...
Updated:July 15, 2025 19:45 IST2025-07-15T15:03:50+5:302025-07-15T19:45:19+5:30
Things To Keep In Mind While Making Ghee At Home : Ghee making mistakes to avoid : How to make ghee at home : घरच्याघरीच तूप तयार करताना बिघडते किंवा व्यवस्थित होत नाही, तर मग या टिप्स ठरतील फायदेशीर...

घरच्याघरीच तूप काढणे हे कोणत्याही कलेपेक्षा कमी नाही. आपण कायमच (Things To Keep In Mind While Making Ghee At Home) आपल्या आजी किंवा आईकडून साजूक तूप कसे तयार करायचे यांच्या टिप्स शिकत असतो. घरी तयार केलेल्या तुपाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो.
परंतु आजकाल घरच्याघरीच तूप करताना कधी त्याला हवा तसा (Ghee making mistakes to avoid) सुवास येत नाही, कधी रंग फिकट राहतो, तर कधी साय करपते. खरंतर तूप तयार करणे वाटते तितके सोपे काम नाही. योग्य तंत्र, तापमान आणि संयम यांची आवश्यकता असते, तेव्हाच परिपूर्ण पद्धतीने घरगुती तूप तयार करता येते.
घरच्याघरीच तूप तयार करताना, साय योग्य पद्धतीने साठवली (How to make ghee at home) गेली पाहिजे, लोणी योग्य तापमानावर वितळले नाही किंवा गॅसच्या फ्लेमवर योग्य नियंत्रण नसेल तर घरी तयार केलेलं तूप बिघडतेच. साजूक तूप करताना अगदी लहान - सहान गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. साजूक तूप तयार करताना ते बिघडू नये किंवा तूप अस्सल घरगुती रवाळ आणि दाणेदार हवं असेल तर काही खास पारंपरिक टिप्स पाहूयात.
१. साय योग्य पद्धतीने साठवणे :-
तूप काढण्यासाठी साय योग्य पद्धतीने साठवणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे दररोज उकळलेल्या दुधावरील साय जमा करून फ्रिजमध्ये योग्य प्रकारे साठवावी. जर साय नीट साठवली नाही, तर ती खराब होण्याची शक्यता असते आणि अशा सायीपासून चांगले तूप निघणार नाही. त्यामुळे साय स्वच्छ डब्यात, झाकण लावून, थंड ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. यासाठीच, साय खूप दिवस साठवून ठेवू नये. शक्यतो ७ ते १० दिवसांच्या आत तूप काढून घ्यावे. यापेक्षा जास्त दिवस साय ठेवली, तर ती आंबट होऊ शकते किंवा खराब होण्याचा धोका वाढतो. या काळात साठवलेल्या सायीत थोडं दही मिसळून ती फेटल्यास लोणी लवकर आणि चांगल्या प्रकारे वेगळं होतं, ज्यामुळे तूप काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते.
२. साजूक तूप तयार करताना कोमट पाणी वापरणे :-
चांगले रवाळ आणि दाणेदार साजूक तूप हवे असल्यास कोमट पाण्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे. अनेकजणी पाणी घालत नाहीत, त्यामुळे साय नीट शिजतही नाही. म्हणून, साय उकळताना हलक्या कोमट पाण्याचा वापर करा. यावेळी अगदी थंड किंवा खूप गरम पाणी टाकू नका, कारण त्यामुळे लोणी वेगळं करण्यात अडचण येऊ शकते. तूप बनवताना योग्य तापमान राखणे गरजेचे असते यामुळे तूप लवकरच वर तरंगू लागते.
३. तूप कढवताना गॅस हाय फ्लेमवर ठेवू नये :-
बर्याचवेळा घाईगडबडीत काहीजणी तूप गॅसच्या हाय फ्लेमवर शिजवायला सुरुवात करतात, पण हे अगदी चुकीचे आहे. तूप नेहमी मंद आचेवरच कढवायला हवे, कारण साय हळूहळू आणि नीट शिजली पाहिजे. गॅसच्या हाय फ्लेमवर साय लवकर करपत जाते, ज्यामुळे तूपाचा रंग काळसर होतो आणि त्याचा सुगंध व चव दोन्ही बिघडतात. त्यामुळे तूप करताना मंद आचेवर सतत ढवळत राहा, जेणेकरून तूप दाणेदार, सुवासिक आणि स्वादिष्ट तयार होईल.
४. साजूक तुपाला सुगंध येण्यासाठी :-
जर साय बऱ्याच दिवसांची असेल, तर तिच्यातून कुबट, घाणेरडी दुर्गंधी येऊ लागते. अशावेळी तूप करताना तुपाला चव आणि सुगंध येण्यासाठी लवंग, कडीपत्ता, मेथी दाण्यांचा वापर करता येतो. फक्त २ ते ३ लवंगा, कडीपत्ता किंवा मेथी दाणे हे घटक साय शिजवत असताना त्यात टाका. यामुळे तूपाला छान सुगंध येतो आणि सायीमधील दुर्गंधही कमी होतो. त्यामुळे तूप अधिक स्वादिष्ट आणि शुद्ध होते.
५. तूप गाळताना दुर्लक्ष करू नका :-
तूप गाळताना ते थोडं कोमट असावं, म्हणजे ते सहजपणे गाळता येतं. तूप गाळण्यासाठी स्टीलची गाळणी, किंवा सुती कापड तसेच पातळ जाळीच्या चाळणीचा देखील वापर करु शकता. योग्य प्रकारे गाळलेलं तूप केवळ स्वच्छच राहत नाही, तर त्याचा रंग, चव आणि सुगंध सुद्धा अधिक खुलून येतो.