1 / 9पाऊस चहा आणि तो असं वाचून तुम्हाला वाटेल की काय सांगताय, तर तसलं काही? आम्ही बोलतोय चहासोबतच्या खास पदार्थांविषयी.. पावसाळ्यात असा बेत तर हवाच. पावसाळा आला की नुसता चहा प्यावासा वाटत नाही. एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात कोणता तरी खुसखुशीत पदार्थ असला की चहा प्यायची मज्जाच येते.2 / 9पण चहासोबत खायला कोणते पदार्थ करावेत असा प्रश्न जर पडत असेल तर ही यादी पाहा. रोज किंवा दर रविवारी काही तरी वेगळा पदार्थ करा सगळे आनंदाने खातील.3 / 9पावसाळा-चहा-वडापाव हे त्रिकूट तर सगळ्यांच्याच आवडीचे आहे. पावसाळ्यात गरमागरम वडा खायची मज्जाच काही वेगळी आहे. घरी केलेला वडा विकतपेक्षा जास्त चांगला असतो. 4 / 9दुसरा नित्याने नाश्त्यासाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे भजी. कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, बोंडा भजी असे अनेक प्रकार असतात. सगळे आवडीने खातात. 5 / 9खस्ता कचोरी हा प्रकार इतर राज्यांमध्ये फार आवडीने खाल्ला जातो. चवीला फारच छान असते. मसालेदार कचोरी विविध डाळींच्या मिश्रणातून केली जाते. 6 / 9अगदी सोपी नमकीन रेसिपी म्हणजे गव्हाची निमकी. गव्हाच्या पीठात ओवा तसेच कांद्याचे बी घालून कुरकुरीत पदार्थ केला जातो. 7 / 9समोसा हा ही वडा आणि भजीच्याच पंगतीतला.फारच लोकप्रिय असा पदार्थ आहे. घरी करायला सोपा आहे. विविध प्रकारचे सारण भरुन करता येतो. 8 / 9कोथिंबीर वडी करायला अगदीच सोपी असते. वाफवून करु शकता, परतून करु शकता. मस्तच लागते. पावसाळ्यात नक्की करा. चहासोबत खायला मज्जा येते. 9 / 9पावसाळ्यात मस्त मका मिळतो. भाजलेला मका बटर, लिंबू, लाल तिखट, मीठ लावून अगदी मस्त लागतो. पावसाळ्यात मका खायला अगदी मस्त वाटते.