1 / 7उन्हाळ्यात साठवणीच्या पदार्थांत हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे लोणचं. मस्त आंबट - गोड कच्च्या कैरीचं लोणचं खायला सगळ्यांनाच आवडतं. उन्हाळ्यात घरोघरी वर्षभर टिकणारे कच्च्या कैरीच (The Best Mango Varieties to Use for Traditional Indian Pickles) लोणच केलं जात. 2 / 7चविष्ट आणि वर्षभर खराब न होता टिकणारं लोणचं (Only use these Raw Mango Varieties to make a Pickle) तयार करताना योग्य प्रकारच्या कैऱ्या निवडणे खूप महत्वाचे असते. सर्वच प्रकारच्या कैऱ्या लोणच्यासाठी योग्य नसतात.3 / 7लोणचं तयार करण्यासाठी योग्य कैऱ्यांची निवड केली तर (The Best Types of Raw Mangoes for Pickling) लोणचं चवीला उत्तम आणि वर्षभर खराब न होता चांगलं टिकत... 4 / 7सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया (MasterChef Pankaj Bhadouria) यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत, लोणचं तयार करण्यासाठी कोणत्या ३ प्रकारच्या कैऱ्या सगळ्यांत उत्तम आहेत याबद्दल अधिक माहिती दिली आहे...5 / 7महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली ही कैरी लोणच्यासाठी एकदम उत्तम मानली जाते. ही कैरी आकाराने मोठी आणि घट्ट गराची असते. तसेच या कैरीला आंबटपणा खूप छान असतो. लोणचं करताना चांगले तुकडे करता येतात, लोणचं मुरल्यानंतरही गर एकसंध राहतो, फाटत नाही. टिकाऊ व पारंपरिक प्रकारच्या तेल आणि मसाल्याच्या लोणच्यासाठी ही कैरी सर्वोत्तम मानली जाते. 6 / 7 दक्षिण भारताची खासियत असणाऱ्या या कैरीचे लोणचं चविष्ट होते. ही कैरी हल्ली महाराष्ट्रातही मिळते, त्यामुळे लोणचं तयार करण्यासाठी आपण ही तोतापुरी कैरी वापरु शकता. थोडीशी लांबट, पक्ष्यांच्या चोचीसारख्या आकाराच्या या कैरीचे लोणचं चवीला उत्तम होत. अतिशय आंबट आणि हलकीशी तिखटसर चव असणारी कैरी लोणच्यासाठी उत्तम असते. या कैरीच लोणचं केल्यावर चवीत एक वेगळा झणझणीतपणा येतो.7 / 7रामकेला कैरी ही लोणच्यासाठी अतिशय उत्तम आणि लोकप्रिय जात आहे. रामकेला कैरी खूप आंबट असते यामुळे लोणच्याची चव छान झणझणीत होते. रामकेला कैरीची साल पातळ पण मजबूत असते, त्यामुळे सालीसकट लोणच्यात मुरवल्यावर लोणच्याला उत्कृष्ट टेक्स्चर मिळते. रामकेला कैरीपासून केलेलं लोणचं दीर्घकाळ टिकतं आणि बिघडत नाही. या कैरीचा गर मसाला आणि तेल चांगलं शोषून घेतो, ज्यामुळे लोणच्याची चव अधिक चविष्ट लागते. विशेषतः जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे, साठवून ठेवता येईल असं झणझणीत लोणचं हवं असेल, तर रामकेला कैरीचा वापर जरूर करा.