Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

Updated:March 14, 2026 08:05 IST2026-03-14T08:00:14+5:302026-03-14T08:05:01+5:30

Summer Special Food - Eat 6 traditional foods every day in summer, cool your stomach and keep your mood happy!!!! : उन्हाळ्यात खा पोटाला थंडावा देणारे पदार्थ.

Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

उन्हाळ्यात खायलाच हवेत असे ६ पदार्थ. आरोग्यासाठी फायद्याचे आणि पोटाला आराम देतात. पाहा कोणते आहेत. रोजच्या आहारात घेता येतील. तसेच करायला सोपे आहेत.

Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

दहीभात हा उन्हाळ्यात खाण्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ मानला जातो. थंड दह्यात भात मिसळून खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि पचन व्यवस्थित राहते. जास्त तिखट किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर दहीभात खाल्ल्यास पोट हलके वाटते.

Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

सातूचे पीठ हा उन्हाळ्यातील अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे. भाजलेल्या हरभऱ्यापासून तयार केलेले सातू पाण्यात मिसळून प्यायले जाते, त्यात इतरही पदार्थ घातले जातात. हे शरीराला ऊर्जा देते आणि उष्णतेचा त्रास कमी करण्यास मदत करते. पोटासाठीही ते हलके आणि पचायला सोपे असते.

Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

काकडी हा उन्हाळ्यात खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. काकडीची कोशिंबीर किंवा साधी काकडी खाल्ल्याने शरीर ताजेतवाने राहते.

Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

कलिंगड हे ही उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे फळ आहे. त्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीराला हायड्रेशन मिळते आणि उष्णतेमुळे येणारा थकवा कमी होण्यास मदत होते.

Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

दही किंवा लस्सी हे पदार्थही उन्हाळ्यात पोटाला शांत ठेवतात. दह्यातील नैसर्गिक गुणधर्म पचन सुधारण्यास मदत करतात आणि शरीराला गारवा देतात.

Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

नाचणीचे आंबील हा पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे, जो उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानला जातो. नाचणीचे आंबील पोटाला थंडावा देते, पचनासाठी हलकी असते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देखील देते.