Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

Updated:July 17, 2025 18:40 IST2025-06-11T18:04:00+5:302025-07-17T18:40:47+5:30

special vegetables during monsoon! Eat these 6 vegetables : पावसाळ्यात खास रानभाज्या मिळतात. पाहा कोणत्या आहेत. अगदी पौष्टिक भाज्या.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

पावसाळ्यात भाज्या फळे छान टवटवीत मिळतात. सगळीकडे पावसामुळे पुरेपुर पाणी उपलब्ध असते. रोपं, झाडं, कंद सगळेच छान वाढतात. भाज्या जरा जास्त धुवायला लागतात. कारण माती खुप असते. चिखल असतो. पण भाजी मात्र सुंदर असते.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

भाज्यांमध्ये प्रकार असतात. जसे की साध्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या असे प्रकार असतात. त्यामध्ये आणखी एका प्रकारचा समावेश होतो तो म्हणजे रानभाजी. रानभाज्या फार लोकांना माहिती नसतात. आजी आजोबांना विचारल्यावर त्यांची नावे पटापट कळतील. मात्र या रानभाज्या फार पौष्टिक असतात.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

अळू ही भाजी तशी प्रसिद्ध आहे. अळूवडी, अळूचं फदफद, पातळ भाजी घरोघरी केली जाते. अळू पावसाळ्यात अगदी मस्त पिकतो. या भाजीत जीवनसत्त्व इ तसेच मॅग्नेशियम आणि इतरही अनेक गुणधर्म असतात.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

पावसाळ्यात अंबाडीची भाजी मिळते. त्यात लोह असते, झिंक असते इतरही गुणधर्म असतात. अशक्तपणा कमी होण्यासाठी ही भाजी फायद्याची ठरते.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

टाकळ्याची भाजी करायला अगदी सोपी आहे. वजन कमी करण्यासाठी ही भाजी नक्की खा. चवीलाही अगदी छान असते. फक्त पावसाळ्यातच बाजारात मिळते. त्यामुळे या ऋतूत नक्की खावी.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

भारंगी ही रानभाजी फार पौष्टिक असते. सर्दी खोकला ताप बरा करण्यासाठी भाजीचा फायदा होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी अगदी चांगली आहे.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

घोळाची भाजी कधी खाल्ली आहे का? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अगदी छान आहे तसेच हृदयासाठी पोषक ठरते. वजन कमी करण्यासाठीही मदत करते.

Ranbhajya : पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ! ६ रानभाज्या खा, परंपरेनं दिलेला मेवा तब्येतीसाठी खास वरदान

करटोलीची भाजी पावसाळ्यात मिळते. फार गुणकारी अशी ही रानभाजी एकदा नक्की खाऊन पाहा. त्यात भरपूर सत्वे असतात. चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. लोह मिळवण्यासाठी अगदी छान भाजी आहे.