1 / 10१. आपल्या रोजच्या जेवणात कोणत्या ना कोणत्या डाळीचा समावेश असतोच. स्वयंपाक करताना डाळ शिजायला लावण्यापुर्वी आपण ती २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून घेतो. पण भिजत मात्र टाकत नाही.2 / 10२. पण कोणत्याही पदार्थासाठी डाळ वापरणार असाल तर ती आधी काही तास भिजत टाकावी, असा सल्ला काही आहारतज्ज्ञ देतात. याविषयीचा एक व्हिडिओ satvicmovement या पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये शिजवण्याआधी डाळ भिजत टाकल्याने आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात, याविषयी माहिती देण्यात आली आहे. 3 / 10३. शिजवण्यापुर्वी डाळ भिजत टाकण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे यामुळे डाळ पचायला सोपी होते. 4 / 10४. डाळींमध्ये असणारी सगळी खनिजे शरीरात व्यवस्थितपणे शोषली जातात. हा त्याचा दुसरा फायदा. 5 / 10५. डाळ काही तास भिजवून नंतर शिजवली तर नक्कीच ती शिजायला कमी वेळ लागतो. शिवाय यामुळे गॅसचीही बचत होते.6 / 10६. डाळींमुळे काही जणांना ॲसिडीटी आणि गॅसेसचा त्रास होतो. त्यामुळे डाळ जर शिजवण्यापुर्वी भिजत घातली, तर त्यामुळे अशा प्रकारचा त्रास कमी होतो. 7 / 10७. पण कोणती डाळ किती वेळ भिजत घालावी, याची माहितीही करून घ्या.8 / 10८. राजमा, छोले, हरबरे शिजविण्यापुर्वी ८ ते १० तास भिजत घालावेत.9 / 10९. मुग, तूर, उडीद जर अख्ये असतील तर ते ६ ते ८ तास भिजत घालावे.10 / 10१०. त्यांच्या डाळी केलेल्या असतील तर त्या ४ ते ६ तास भिजत घालणे पुरेसे ठरते.