श्रावणात मिळणारी ६ फळं खाल्ली की नाही? स्वस्तात मस्त लोकल फळे तब्यतेसाठी वरदान
Updated:July 28, 2025 11:31 IST2025-07-28T11:23:27+5:302025-07-28T11:31:28+5:30
Shravan Special 6 fruits, Cheap and delicious local fruits, healthy food and fruits , fruits for fasting : उपासाला आणि आरोग्यासाठी मस्त अशी फळे नक्की खा. श्रावणात मिळणारी फळांची मेजवानी.

श्रावणात उपासाला विविध पदार्थ तर आपण खातोच. एकदम मस्त चवीचे अनेकविध पदार्थ खास श्रावणात केले जातात. मात्र याच महिन्यात पोटभर फळेही खावीत. उपासाला चालतात आणि आरोग्यासाठी एकदम फायद्याची असतात.
पावसाळ्यात जांभूळ आरामात उपलब्ध होते. शरीरातील साखर नियंत्रित ठेवायची असेल तर आहारात जांभूळ असणे फार फायद्याचे ठरते. श्रावणात हे फळ आरामात उपलब्ध होते नक्की खा.
श्रावणाच्या मध्यात आणि शेवटी सीताफळ बाजारात येते. आजूबाजूला झाड असेल तर आणखीच मस्त. छान गोडसर आणि मऊ असे हे फळ असते. त्यात अनेक पोषणसत्वे असतात. हे फळ वर्षभर मिळत नाही. त्यामुळे या वर्षे ताजे सीताफळ नक्की खा.
पोट साफ होण्याची कुरकुरच बंद करेल असे एक फळ म्हणजे अंजीर. यात भरपूर फायबर्स असतात. त्यामुळे पचनासाठी एकदम मस्त असते. चवही अगदी गोड असते. फार औषधी फळ आहे.
पावसाळ्यात छान मोठे आणि भरलेले पेरु खायला मिळतात. यात जीवनसत्त्व सी भरपूर असते. शिवाय फायबर्सचाही अत्यंत उत्तम असा स्त्रोत आहे. मीठ मसाला लावून पेरु खायला फार मज्जा येते. जिभेचेही चोचले पुरवता येतात आणि आरोग्यासाठीही चांगले.
व्रताच्या दिवशी उपासाला किंवा सणासाठी धावपळ असेल तर डाळिंब्याचे दाणे पटापट येता जाता खात राहायचे. रक्तवाढीसाठी एकदम उपयुक्त असे हे फळ आहे. त्वचेसाठी कमाल आहे. शरीराला ऊर्जाही देते.
खजूर तर आपण खातोच. मात्र खजूर फळ कधी खाल्ले का? पिवळे - केशरी असे हे फळ पौष्टिक असते. चवीला अगदी गोडसर असते. तसेच त्यात बरीच सत्वे असतात. शिवाय हे फळ शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करते.