1 / 10भारतात प्रत्येक राज्यामध्ये लोणचे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खास वर्षभरासाठी हे साठवणीचे पदार्थ केले जातात. तसेच आंबा- कैरी या सिझनमध्ये येतात. 2 / 10भारतामध्ये राज्याराज्यातून तर सोडाच घराघरातून लोणचे करायची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची स्वतःची एक खासियत असते. त्यामुळे प्रत्येकाच्या हातचे लोणचे चवीला वेगळे लागते.3 / 10विकत विविध प्रकारची लोणची मिळतात. चांगल्या मोठ्या ब्रॅण्डची ही लोणची घरी केलेल्या लोणच्यांसमोर मात्र फिकीच. अनेक प्रकारची लोणची घरी करता येतात. पाहा महाराष्ट्रामध्ये कोणती लोणची लोकप्रिय आहेत.4 / 10कैरीचे लोणचे हे सगळ्यांनाच फार आवडते. काही जण हे लोणचं वाटून करतात. तर काहींना फेसलेले आवडते. काहींना फोडींचे आवडते तर काहींना किसलेले. भारतभरात हे लोणचे केले जाते.5 / 10आवळ्याचे लोणचे चवीला फार सुंदर लागते. पौष्टिकही असते. हे लोणचे करायची पद्धत वेगवेगळी असली तरी छान मोहरीची फोडणी देऊनच केले जाते.6 / 10लसणाचे लोणचे चवीला फार छान लागते. फार लोकांना हा प्रकार माहितीचा नाही. करायला अगदीच सोपा आहे. भाताबरोबर मस्त लागते.7 / 10मिक्स भाज्यांचे लोणचे हॉटेलमध्ये मिळते. ते घरी करायलाही फार सोपे असते. छान ताजी गाजरे वापरली तसेच मटारही छान ताजे वापरले की भाज्यांचे लोणचे मस्त झालेच म्हणून समजा. 8 / 10काहींना तिखट पदार्थ फार आवडतात. अशा लोकांसाठी खास मिरचीचे लोणचे केले जाते. चवीला मस्त झणझणीत असते. दह्यात कालवूनही खाल्ले जाते.9 / 10बडीशेप आपण जेवणानंतर खातो. मात्र जेवताना ताटात बडीशेपेचे लोणचे असेल तर मग और क्या चाहिए. चवीला फार रुचकर व चमचमीत असे हे लोणचे मस्त लालचुटूक असते. 10 / 10करवंदाचे फळ चवीला जेवढे छान तेवढेच त्याचे लोणचेही. उन्हाळ्यामध्ये खास हा प्रकार करायलाच हवा. ताजी करवंदे या सिझनमध्ये येतात. त्याचे हे लोणचे करा. फारच सोपे असते.