भारतीय चटण्या म्हणजे जेवण चट्टमट्टा, पाहा भारतातील सर्व राज्यातील झणझणीत चटण्या
Updated:September 24, 2025 16:24 IST2025-09-24T16:16:59+5:302025-09-24T16:24:14+5:30
See the spicy chutneys from Indian states, spicy and tasty chutney recipes : भारतातील विविध राज्यात करतात या प्रकारच्या चटणी.

भारतात आजकाल टोमॅटो सॉस, केचअप, शेजवान सॉस आदी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. मात्र या पदार्थांच्या फार आधीपासून काही तोंडीलावण्याचे पदार्थ भारतात केले जात आहेत. घरोघरी आवडीने खाल्ले जात आहेत.
भारतातील विविध राज्यांत ताटात डावीकडे वाढण्यासाठी म्हणजेच तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या चटण्या आणि विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. भाजीच्याऐवजी काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तर त्यावेळी चटणी हा पदार्थ एकदम मस्त पर्याय असतो.
महाराष्ट्रात ठेचा हा पदार्थ तोंडीलावण्यासाठी एकदम प्रसिद्ध आहे. झणझणीत आणि अस्सल तिखट चवीचा ठेचा महाराष्ट्रातल्या घराघरात केला जातो. शेंगदाणे, हिरवी मिरची तसेच कोथिंबीर असे विविध पदार्थ वापरुन हा ठेचा केला जातो.
साऊथ इंडियन चटणींचे प्रकार तर भारतात सगळीकडे लोकप्रिय आहेत. मात्र एक पदार्थ आहे जो फारच जास्त आवडीने खाल्ला जातो. तो म्हणजे गनपावडर. विविध डाळी वाटून केली जाणारी ही सुखी चटणी अनेक महिने टिकते. भातासोबतही खातात.
गुजरातमध्ये कांदा-कैरी हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. मस्त कैरी - कांदा वाटून घेऊन त्याला छान मोहरी आणि कडीपत्याची फोडणी द्यायची. आंबट-गोड लागणारी ही चटणी एकदम मस्त लागते. त्यात थोडा गुळही घातला जातो.
बंगालमध्ये कासुंदी नावाचा पदार्थ केला जातो. ही चटणी आंबट गोड तसेच तिखट अशा साऱ्या चवींचे मिश्रण असते. मोहरीचा वापर करुन रेसिपी करतात. यात मोहरी हा महत्त्वाचा घटक आहे.
हिमाचलमध्ये चंबा चुख नावाचा एक पदार्थ केला जातो. सुकी लाल मिरची आणि हिमाचलचे खास मसाले वापरुन ही रेसिपी केली जाते. भातासोबत तसेच इतरही पदार्थांसोबत खाल्ली जाते.
केरळमध्ये भाजलेल्या नारळाची चम्मंथी केली जाते. मसालेदार आणि सुगंधी अशी ही चटणी डोसा, इडली, मेदूवडा अशा पदार्थांसोबत खाल्ली जाते.
आसाममध्ये केली जाणारी रेसिपी म्हणजे आलू- पिटिका. मऊ-मऊ उकडलेले बटाटे कुस्करुन घ्यायचे. त्यात मोहरीचे तेल आणि इतरही काही पदार्थ घातले जातात. मस्त चव लागते. अगदी साधी रेसिपी आहे.
आंध्र प्रदेशात कारल्याची पचडी म्हणजेच कोशिंबीर केली जाते. त्याला कंदी पचडी असे म्हणतात. त्यात हिरवी मिरची, मसाले आणि इतरही काही पदार्थ घातले जातात. तिकडे घरोघरी ही चटणी आवडीने खाल्ली जाते. आरोग्यासाठी ही चटणी फायदेशीर ठरते.