1 / 8तुळशीला आपल्याकडे देवाचे स्थान दिले जाते. तुळस ही विविध कार्यांमध्ये वापरतात तसेच पुजेच्या सामग्रीत तुळशीचे पाने असतात. तीर्थ पिताना कधी नीट पाहीले तर त्यात तुम्हाला तुळशीचे पान दिसेलच. 2 / 8तुळस दारात असायलाच हवी अशी भारतीय मान्यता आहे. त्यामागे कारणेही तशीच आहेत. तुळस फार औषधी असते. त्यामुळे आयुर्वेदात तुळशीला औषध असेच म्हटले जाते. 3 / 8तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच त्यामुळे सर्दी बरी होते आणि ताप खोकलाही. त्यामुळे पावसाळ्यात आहारात तुळस असावीच. 4 / 8तुळशीमध्ये अॅडॅप्टोजेनिक गुणधर्म असतात, जे ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुळशीचे पाणी प्यायल्याने मानसिक शांतता मिळते आणि मनही शांत राहते. 5 / 8तुळशीचे पाणी पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेसाठी अगदी उत्तम आहे. ते पचन एंझाइम्सच्या निर्मितीस चालना देते आणि गॅस, अपचन, आणि सूज यांसारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करते.6 / 8श्वसनमार्गात काही अडथळे येऊ नयेत. तसेच संसर्ग होऊ नयेत यासाठी तुळशीचे पाणी उपयुक्त ठरते. तुळशीत अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. 7 / 8तुळशीमध्ये असलेले फाइटोकेमिकल्स इन्सुलिनच्या प्रमाणात सुधारणा करतात आणि इन्सुलिनचे काही त्रास असतील तर बरे करतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेहाचा त्रास होत नाही.8 / 8वजन कमी करण्यासाठी अगदीच फायद्याचे असे हे पाणी आहे. पाण्यात तुळस उकळवायची आणि रोज सकाळी तसे पाणी प्यायचे आरोग्यासाठी अगदीच फायद्याचे ठरेल. वजन कमी करण्यासाठी मदत होईल.