1 / 8घरोघरी केला जाणारा अगदी सोपा आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कढी. ताक उरलं म्हणून कढी केली असं होत नाही तर खास कढी करायची म्हणून जास्तीचं ताक घरोघरी केलं जातं. कढी तेवढ्या आवडीने प्यायलीही जाते. 2 / 8कढी करायला अगदी सोपी आहे. कडीपत्ता, जिरं, मोहरी, कोथिंबीर, हिंग, हळद अशी साधी फोडणी करायची. ताकाला बेसन लावायचं आणि मस्त गरमागरम कढी करायची. मात्र कढीचे इतरही काही प्रकार असतात. 3 / 8कढी पकोडा हा पदार्थ म्हणजे जगात भारी. पकोड्यासाठी पालकाची पाने वापरा आणि कांदाही घ्या. चव आणखी मस्त येते. कढीलाही लसणाची फोडणी द्या. 4 / 8पांढरी कढी काही ठिकाणी केली जाते. ही कढी काही वेगळी नाही फक्त कढी करताना त्यात हळद घालायची नाही बेसन जरा कमी घालायची. म्हणजे कढी पांढरी होते. चवीला छानच लागते. 5 / 8काळ्या चण्याची कढी एकदम मसालेदार आणि चविष्ट पदार्थ आहे. कढी करुन झाल्यावर वरतून मस्त फोडणी दिली की त्याची चव आणखी मस्त लागते. 6 / 8कैरीची कढी हा एक पारंपरिक पदार्थ आहे. मे महिन्यात हा पदार्थ केला जातो. भातासोबत ही कढी एकदम मस्त लागते. करायलाही सोपी आहे. कैरी शिजवून किंवा किसून घातली की छान एकजीव होते.7 / 8गुजराथी कढी हा पदार्थही साध्या कढीसारखाच करायचा. मात्र त्यात जास्त साखर घातली जाते. गुजराथी कढी फार गोड असते. 8 / 8मसालेदार तुपावर केली जाणारी घट्ट आणि चमचमीत कढी म्हणजे राजस्थानी कढी. ही कढी इतर प्रकारांपेक्षा जास्त घट्ट असते. तसेच फोडणी करताना इतरही काही पदार्थ त्यात घातले जातात.