महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

Updated:March 26, 2026 13:41 IST2026-03-26T13:31:35+5:302026-03-26T13:41:10+5:30

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

उन्हाळ्यातला एक उत्तम आहार म्हणजे सातूचं पीठ (sattu ka atta recipe). सातूचं पीठ हा आपल्याकडचा एक पारंपरिक पदार्थ आणि तो खासकरून उन्हाळ्यात खाल्ला जातो.(how to make satuche pith)

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

सातूचं पीठ उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते असं म्हणतात. शिवाय अंगात उर्जाही टिकून राहाते. उन्हाळ्यात बऱ्याचदा काहीही खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी थोडंसं सातूचं पीठ दुधात किंवा पाण्यात कालवून खाल्लं तरी चालतं. अशक्तपणा जाणवत नाही.(Summer Special Recipe of Satuche Pith)

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

सायंकाळच्या वेळी थोडीशी भूक लागते. ही भूक भागविण्यासाठी काहीतरी पौष्टिक हवंच असतं. अशावेळी सातूचं पीठ हा एक उत्तम पर्याय असू शकतो. अगदी ८- १० महिन्यांच्या बाळापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणालाही सातूचं पीठ चालतं.

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी आणि मधुमेह असणाऱ्या लोकांसाठीही सातूचं पीठ हा एक उत्तम आहार आहे. असं हे बहुगुणी सातूचं पीठ घरच्याघरी कसं करायचं ते पाहूया..

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

सातूचं पीठ करण्यासाठी २ वाट्या गहू आणि १ वाटी हरबऱ्याची डाळ घ्या. हे दोन्ही स्वच्छ धुवा आणि नंतर एका कापडावर पसरवून पंख्याखाली ठेवून एखादा तास सुकवून घ्या. त्यानंतर गहू आणि डाळ दोन्ही एकत्रितपणे कढईत मंद आचेवर भाजून घ्या.

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

त्यानंतर १ चमचा जिरेही भाजून घ्या. गहू, हरबरा डाळ आणि जिरे थंड झाल्यानंतर एकत्रितपणे मिक्सरमध्ये घाला किंवा गिरणीत दळायला द्या.

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

त्यामध्ये २ टीस्पून सुंठ आणि १ टीस्पून वेलची पावडरही घाला सातूचे पीठ आणखी जास्त पौष्टिक आणि चवदार होईल. हे पीठ एका भांड्यात घ्यावे. त्यात दूध किंवा पाणी घालवून कालवावे. चवीनुसार साखर किंवा गूळ घालावा. अतिशय चविष्ट लागते. ट्राय करून पाहा.