Join us   

रामनवमी विशेष नैवेद्याचे ५ गोड पदार्थ- करायला सोपे, अतिशय चवदार आणि झटपट होणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 11:24 AM

1 / 6
अयोध्येसकट सगळ्या भारतातच रामनवमी मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी होत आहे. दुपारी १२ वाजता घरोघरी राम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि रामाला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. रामाला नैवेद्य दाखविण्यासाठी कोणते गोड पदार्थ कमी वेळेत करता येऊ शकतात ते पाहा..
2 / 6
सगळ्यात सोपा आणि बहुतांश लोकांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे आंबा. सध्या आंब्याचा सिझन आहे. रामरायाच्या नैवेद्यासाठी तुम्ही झटपट आमरस करू शकता
3 / 6
दुसरा एक सोपा पदार्थ तुम्ही करू शकता तो म्हणजे बासुंदी. गॅसवर एकीकडे दूध गरम करायला ठेवून दिलं की झालं. ते छान आळून येतं. गरजेनुसार साखर, सुकामेवा घातला की झाली बासुंदी तयार.
4 / 6
शिरा हा देखील एक सोपा पदार्थ आहे. या शिऱ्यामध्ये तुम्ही आमरस, केळी, अननस टाकून त्याला वेगळा फ्लेवर देऊ शकता.
5 / 6
खीर प्रकारातले नैवेद्य रामरायाच्या आवडीचे असतात असं म्हणतात. शेवयाची खीर, तांदळाची खीर तुम्ही झटपट करू शकता.
6 / 6
श्रीखंड किंवा आम्रखंड हा पदार्थही अगदी कमी वेळेत होऊ शकतो. ते इंस्टंट पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी दही मात्र घट्ट हवं.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अयोध्याराम मंदिरराम नवमी